गुरे-ढोरे रस्त्यावर आणल्यास आता कैदऐवजी दंड आकारणार

गुरे-ढोरे रस्त्यावर आणल्यास आता कैदऐवजी दंड आकारणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  गुरा-ढोरांची रस्त्यावर ने-आण केल्यास आता कैदेऐवजी दंडाची तरतूद करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील कायदे व नियम इत्यादींमध्ये असलेल्या शिक्षेच्या तरतुदींमध्ये निर्दोषीकरण करण्याच्या द़ृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने गुरे-ढोरे रस्त्यावर नेणे, आणणे शिक्षेच्या तरतुदी कमीत कमी करण्यासंदर्भात दुरुस्ती करण्यात येणार आहे.

हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीस मान्यता

शासकीय जमिनीवर बेकरी व्यवसायासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीस मॉडर्न फूड एंटरप्राईझेसबरोबर व्यावसायिक करार करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अंधेरीतील परजापूर आणि गोरेगाव येथील मॉडर्न बेकरीज् इंडिया लि. यांना कब्जे हक्काने मंजूर झालेल्या आणि हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीस शासन मान्यतेशिवाय हस्तांतरित झालेल्या जमिनीवर बेकरी व्यवसाय करण्याच्या हेतूने या करारास मान्यता देण्यात आली आहे. ही जमीन एकूण 22 हजार 264 चौ. मी. इतकी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news