गळ्यात पट्टा बांधून तरुणाला कुत्र्यासारखे भुंकायला लावले

गळ्यात पट्टा बांधून तरुणाला कुत्र्यासारखे भुंकायला लावले
Published on
Updated on

भोपाळ : एका हिंदू तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधून फरफटत नेऊन त्याला कुत्र्यासारखे भुंकायला लावणारा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तो तरुण रस्त्यावर गुडघे टेकून बसला असून आणखी एका व्यक्तीने पट्टा पकडला आहे. तो तरुणाला कुत्र्यासारखे भुंकायला सांगत आहे. मीसुद्धा मियाँ भाई बनण्यास तयार आहे, असे पीडित तरुण म्हणत असल्याचे दिसत आहे.

पीडिताच्या तक्रारीनुसार याप्रकरणी पोलिसांनी 6 मुस्लिम आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बिहारचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी पोलिस आयुक्त हरिनारायणचारी मिश्रा यांच्याकडून 24 तासांत प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. मी व्हिडीओ पाहिला आहे. हे प्रकरण खूप गंभीर आहे. कोणत्याही माणसाला अशा प्रकारची वागणूक दिली जाऊ नये. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले असल्याचे गृहमंत्री मिश्रा यांनी सांगितले. हा व्हिडीओ भोपाळच्या टिला जमालपुरा परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. जुन्या भोपाळमध्ये बिलाल टिला, फैजान लाला, साहिल बच्चा, मोहम्मद समीर टिला आणि मुफिद खान यांनी विजय नावाच्या तरुणाला मारहाण केली. हा व्हिडीओही त्यांनीच बनवला असल्याचे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news