गणेश नाईक यांना तत्काळ अटक करा

गणेश नाईक यांना तत्काळ अटक करा

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : दीपा चौहान नामक महिलेच्या तक्रारीवरून नेरूळ पोलिसांनी कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार गणेश नाईक यांना तत्काळ अटक करा, असे निर्देश राज्य महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना दिले आहेत.

आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, या पीडित महिलेने महिला आयोगाकडेही तक्रार केली होती. त्यावर तपास करून अहवाल मागवण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी गणेश नाईक यांच्या विरोधात 506 ब हा गुन्हा दाखल केला. त्यानंतर नेरूळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे गणेश नाईकांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.

गणेश नाईक यांच्यापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये झालेला मुलगा आता 15 वर्षांचा असून, त्याच्या न्याय हक्कांसाठी आपण लढा देत असल्याचे तक्रारदार दीपा चौहान यांनी म्हटले आहे. या मुलाला वडील म्हणून स्वत:चे नाव द्यावे आणि माजी खासदार संजीव नाईक व माजी आमदार संदीप नाईक या अन्य दोन मुलांप्रमाणेच या तिसर्‍या मुलालाही संपत्तीत समान हक्क द्यावा, अशी मागणी चौहान यांनी केली आहे. तसे करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिल्यामुळेच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. प्रसंगी न्यायालयातही जाण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news