मुंबई; पुढारी ऑनलाईन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवे गाणे घेवून आली आहे. या गाण्याने अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र चाहूल लागली आहे. याच निमित्त साधत अमृता फडणवीस यांनी 'गणेश वंदना' हे गाणं गायिले आहे. या गाण्यासोबत त्यांनी चाहत्यांना खास संदेश दिला आहे.
अमृता यांनी 'गणेश वंदना' या गाण्यातून भक्तीचे दुसरे नाव सेवा, असा सकारात्मक संदेश देण्यात आला आहे. या गाण्यात अमृता यांनी कुटुंबातील प्रमुख स्त्रीची भूमिका साकारली आहे.
या गाण्यात अमृता पारंपरिक मराठमोळ्या रुपात दिसत आहेत. नाकात नथ आणि नऊवारीमध्ये त्यांचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. हे गाणे गणेश पूजेनाच्या वेळचे आहे.
एकिकडे संपूर्ण कुटुंब गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारीसोबत पुजन करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. तर दुसरीकडे कुटुंबातील स्त्रीला घरातील जबाबदाऱ्या पार पाडून डॉक्टर असल्याने रुग्णालयात रुग्णसेवेसाठी जावे लागते हे दाखविले आहे.
अमृता फडणवीस यांचे हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्याला चाहत्यांकडून अनेक कॉमेंन्टस केल्या जात आहेत. यात अमृता फडणवीस यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
याआधी अमृता फडणवीस यांनी 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त इंग्रजी गाण्यासोबत 'ये नयन डरे डरे', 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…' ही गाणी गायिली आहेत. आता रिलीज झालेल्या गाण्याला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचलंत का?
(VIDEO: Times Music Spiritual वरून साभार)