गटारी स्पेशल : सणात सण गटारीचा सण, अरे तळीरामा…

गटारी स्पेशल : सणात सण गटारीचा सण, अरे तळीरामा…

पुढारी ऑनलाईन डेस्क : सकाळी सकाळीच व्हाॅट्सअप ओपन केलं अन् गटारी अमावस्येचा भन्नाट मॅसेज वाचायला मिळाला. एका तळीराम मित्रानंच तो पाठवलेला. म्हणे, "सणात सण गटारीचा सण, अरे तळीरामा आता तरी बस्स म्हण."

भावानोंsss आज आपला दिवस हाय… कुणीबी कायबी म्हणून द्या आपणं फूल्ल टल्ली असणारंय. कारण, आज गटारी आमावस्या हाय… मित्राचा व्हाॅट्सअप शुभेच्छा कळकळीच्या होत्या राव. पण, मला एक प्रश्न पडला या गटारी अमावस्येला दारू आणि मांस का घेतात माहितीय? नाही ना? मला पण नाही माहिती… चला तर थोडक्यात समजून घेऊ या…

श्रावण महिन्याच्या अगोदर जी अमावस्या येते म्हणजेच आषाढी अमावस्या, यालाच दिव्याची अमावस्या म्हणत्यात भाऊ. आपण याला गटारी अमावस्या म्हणतो… या पाठीमागचं लाॅजिक काय?

तर, लाॅजिक असं की, श्रावण महिन्यात दारू आणि मटण पूर्ण बंद असतं. पुढं महिनाभर त्याला पाहायचंही नाही. म्हणून श्रावण सुरू होत असताना एक दिवस हवी तेवढी दारू आणि मटण खाऊन घ्यायचं. तर, श्रावण महिन्यातच मटण बंद का करायचं?

खरंतर पावसाळा सुरू असतो. सगळीकडे पावसाळ्याचं वातावरण असतं. या दिवसांत मांसाहार म्हणजेच मटण पचत नाही.

श्रावण महिन्यात प्राण्यांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे प्राण्यांची हत्या करायची नसते. जर या महिन्यात प्राण्यांची हत्या केली तर निसर्गचक्र बिघडतं.

इतकंच काय आपला कोळीबांधवदेखील मासेमारीला जात नाही. सरकाकडूनही मासेमारीला बंदी घालण्यात आलेली असते.

बाहेरंच वातावरण घातक जीवजंतूसांठी पोषक असतं. त्यामुळे प्राण्यांच्या शरीरात किंवा शरीरावर हे जीवजंतू असू शकतात. अशा प्राण्यांचं मांस शिजवताना योग्य शिजलं नाही, तर त्यांच्या परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.

श्रावण महिन्यात निसर्गात अनेक पोष्टीक आणि दुर्मिळ भाज्या उगवतात. सहाजिकच श्रावण महिन्यात या भाज्या खाल्ल्या जातात. आता दारू का पित्यात, तर जिथं मटण तिथं दारू, हे समीकरणच आहे. मग, दारू कशी बाजूला केली जाईल? नाही का?

पहा व्हिडीओ : खेडक्याची ही भन्नाट रेसिपी एकदा ट्राय कराच!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news