खाद्यतेल १० रुपयांनी स्वस्त होणार

खाद्यतेल १० रुपयांनी स्वस्त होणार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने कृषी कर घटवल्यामुळे खाद्यतेल लिटरमागे सरासरी 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. अर्थात जुन्या दराचा साठा संपल्यानंतर ऐन दिवाळीत ही स्वस्ताई ग्राहकांच्या हाती पडेल.

केंद्र शासनाने सोयाबीन तेलावरील कृषिकर 20 टक्?क्?यांवरून पाच टक्के आणि क्रूड पाम ऑईलवर कृषिकर 20 टक्क्यांवरून साडेसात टक्के केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारपासून खाद्यतेल सरासरी प्रतिकिलो सहा ते आठ रुपये स्वस्त झाले.

मुंबईत नामांकित कंपन्यांचे खाद्यतेल 170 ते 175 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. या किमतीचा तेलसाठा शिल्लक असल्याने 2 ते 3 दिवस मुंबईकरांना स्वस्त दरात तेल मिळणार नाही. त्यानंतर हे दर प्रतिकिलो 160 ते 165 रुपयांपर्यंत कमी होतील. दिवाळीनंतर मात्र, हेच तेल 130 ते 135 रुपये दरानेदेखील खरेदी करता येईल, असे बॉम्बे ग्रेन डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमणिकलाल छेडा यांनी 'पुढारी'ला सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news