क्युरिऑसिटीने मंगळावर शोधला मिथेन वायू? संशोधनातून समोर

क्युरिऑसिटीने मंगळावर शोधला मिथेन वायू? संशोधनातून समोर
Published on
Updated on

वॉशिंग्टन : क्युरिऑसिटीने मंगळावर शोधला मिथेन वायू. मिथेन हा वायू अनेक सूक्ष्म जीव निर्माण करीत असतात. त्यामुळे जिथे हा वायू असतो तिथे सूक्ष्म जीवांच्या स्वरूपात का होईना, जीवसृष्टी असू शकते असे म्हटले जाते. आता मंगळ भूमीवर 'क्युरिऑसिटी' या रोव्हरने मिथेनचा छडा लावला असावा, असे संशोधकांना वाटते. ज्याठिकाणी 'क्युरिऑसिटी'ला या वायूचे संकेत मिळाले आहेत, ते ठिकाण संशोधकांनी नोंदवून ठेवले आहे.

2012 मध्ये 'क्युरिऑसिटी' मंगळाच्या गेल क्रेटरमध्ये उतरल्यापासून सहा वेळा त्याच्या डिटेक्शन सिस्टीमने मिथेनचे संकेत नोंदवले आहेत. मात्र त्याचा स्रोत संशोधकांना शोधता आलेला नाही. आता काही नव्या विश्‍लेषणानंतर संशोधक मुळात हा वायू कुठे सापडला व तो कुठून आला हे नव्याने शोधत आहेत. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी मिथेनचा हा अज्ञात स्रोत शोधण्यासाठी एक मॉडेल विकसित केले आहे.

मिथेनचा छडा ज्यावेळी लागला, त्यावेळेच्या वार्‍याच्या वेगानुसार तसेच दिशेनुसार या मिथेन कणांचा अभ्यास करण्यात आला. त्यावरून त्याचे संभाव्य उत्सर्जनाचे ठिकाण शोधण्यात येत आहे. पृथ्वीवर मिथेनला जैविक स्रोतही आहेत. त्यामुळे मंगळावर जर हा वायू असेल तर त्याचा जैविक स्रोतही तिथे शोधला जाईल व त्यावरून तेथील जीवसृष्टीबाबत समजू शकेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news