कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरची हद्दवाढ शंभर टक्के झालीच पाहिजे. पण विरोध होत आहे. त्यासंदर्भात चर्चा करावी. हद्दवाढ कृती समिती आणि विरोधी कृती समिती यांची चर्चा होणार आहे. त्यातून सकारात्मक तोडगा निघेल, असे खा. धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने कोल्हापूरला विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही. नाशिक, औरंगाबादपेक्षाही कोल्हापूर पुढे जाईल, असेही ते म्हणाले.

हद्दवाढ झाली तरच कोल्हापूर केंद्र शासनाच्या विविध योजनासाठी पात्र होऊ शकेल ही वस्तुस्थिती आहे, असे सांगून खा. महाडिक म्हणाले, परंतु हद्दवाढीला संबंधित गावांचा विरोध होत असेल तर त्यांचे समाधान करणे आवश्यक आहे. हद्दवाढीत समावेश झाल्यानंतर महापालिका संबंधित गावांना कोणत्या सुविधा देणार, त्यांचा काय फायदा होणार हे समजावून सांगायला पाहिजे. त्यानंतरच हद्दवाढ झाली पाहिजे, असेही खा. महाडिक म्हणाले. यावेळी माजी महापौर सुनील कदम, प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news