कोल्हापूर : हार्ट अटॅकने मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

कोल्हापूर : हार्ट अटॅकने मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बदलती जीवनशैली, वाढता तणाव आणि व्यायामातील बिघडलेल्या संतुलनाने तरुणाईचे जीवन धोक्यात आले आहे. तरुणाईमधील हार्ट अटॅकने होणार्‍या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे.

सध्या तरुणाईत बॉडी बिल्डिंगची क्रेझ आहे. कमी कालावधीत अतिरिक्त व्यायाम करून शरीरयष्टी कमवण्याकडे अनेकांचा कल आहे. याच अतिरिक्त व्यायामाचा भार 'हृदया'ला सोसवत नाही. नॅशनल हेल्थ फॉमिली सर्व्हेमध्ये अतिरिक्त व्यायामामुळे महाराष्ट्रातील 17 टक्के नागरिकांना हृदयाचा धोका निर्माण झाल्याचे समोर आले आहे. हृदयविकाराचा झटका घेऊन मृत्युमुखी पडणार्‍यामध्ये तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या नव्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी तरुणाईसह सर्वच वयोगटातील नागरिकांनी अस्सल भारतीय जीवनशैली आत्मसात केली पाहिजे. तसेच तरुणांचे मृत्यू रोखण्यासाठी शासन स्तरावरही विशेष उपाययोजनांचा कार्यक्रम हाती घेणे महत्त्वाचे आहे.

सद़ृढ हृदयासाठी तज्ज्ञांचा सल्ला

नियमित आरोग्य तपासणी
दररोज 40 मिनिटांचा व्यायाम
संतुलित आहाराचे सेवन
व्यायामशाळेतील अतिरिक्त व्यायाम टाळा
पॅकबंद अन्नपदार्थांचे सेवन टाळा
बिनमोड 7 तास झोप घ्या
दारू, सिगारेट, तंबाखू व्यसनापासून दूर राहा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news