कोल्हापूर : वातावरणामुळे उत्पादनात घट; काजूचे दर वधारणार

कोल्हापूर : वातावरणामुळे उत्पादनात घट; काजूचे दर वधारणार

चंदगड, पुढारी वृत्तसेवा : चंदगड तालुक्यासह कोकणशी संलग्न असलेल्या भागात दमट हवामान व दाट धुक्यांमुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साहजिकच दर वधारणार आहेत.

'पांढरं सोनं' म्हणून काजू प्रक्रिया उद्योगास कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेल्या चंदगड तालुक्यासह कोकणची संलग्न असलेल्या भागात यावर्षी प्रचंड उष्णता तसेच दमट हवामान आणि पडणार्‍या दाट धुक्यामुळे काजूच्या उत्पादनात कमालीची घट होणार असल्याचे दिसते. पूर्व भागात बर्‍यापैकी काजू फुलली आहे.

यावर्षी काजू उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे दर वधारणार हे निश्चित आहे. उत्पादनात वाढ झाली की, दर पाडले जातात आणि उत्पादनात घट झाली की दर वाढतो हा पूर्वापार चाललेला खेळ शेतकर्‍यांना नवा नाही.

काजू उत्पादन चांगले येण्यासाठी यावर्षी सुरुवातीपासूनच पोषक हवामान मिळाले नाही. डिसेंबर आणि अर्ध्या जानेवारीच्या सुरुवातीपासूनच पोषक हवामान मिळाले नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news