![कोल्हापूर में आईस्क्रीम खाने आऊँगा : राहुल गांधी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F11%2F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर में आने के बाद आपके पास आईस्क्रीम खाने जरूर आऊँगा, असे अभिवचन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले ते कोल्हापूरचा शर्वरी माणगावे हिला. भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेड येथे मंगळवारी सकाळी शर्वरी यांना राहुल यांना भेटण्याची संधी मिळाली.
शर्वरी मूळच्या कोल्हापूरच्या. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी त्या नांदेडला गेल्या होत्या. राहुल गांधी यांची यात्रा सुरू होताच सुरक्षारक्षकांच्या मागे थांबून 'राहुलजी राहुलजी' अशी हाक मारत होत्या. ही हाक गांधी यांनी ऐकत शर्वरीला बोलावून घेतले आणि हातात हात घालून तिच्याशी गप्पा मारू लागले.
शर्वरीला 'आप कहाँसे आयी हो' असे विचारले. तेव्हा 'मैैं कोल्हापूरसे आयी हूँ', असे सांगितले. राहुल गांधी यांनी 'क्या काम करती हो?' अशी विचारणा मला केली. तेव्हा मी 'आईस्क्रीम का ठेला चलाती हूँ' असे सांगितले. तेव्हा गांधी यांनी 'कौनसे फ्लेवर के आईस्क्रीम है तुम्हारे पास', असे विचारले. 'कोल्हापूर आने के बाद तुम्हारे पास आईस्क्रीम खाने जरूर आऊँगा', असे सांगितले. 'एक लडकी होकर अच्छा काम कर रही हो, बेस्ट लक' असे राहुल म्हणाले.
अवघ्या पाच मिनिटांच्या या प्रवासात राहुल गांधी यांच्याशी भेटण्याची संधी मिळाल्याने आपण भारावून गेल्याचे सांगून ही भेट आयुष्यातील अनमोल ठेवा असल्याचे शर्वरी यांनी सांगितले.