कोल्हापूर :  ‘देवस्थान’ दोन अश्व घेणार

कोल्हापूर :  ‘देवस्थान’ दोन अश्व घेणार
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : दख्खनचा राजा श्री जोतिबाचा मानाचा अश्व म्हणून देवस्थान समिती दोन अश्व घेणार आहे. समितीकडे आठ अश्वांचा प्रस्ताव आला आहे. रविवारचा खेटा आणि पालखी मानाच्या अश्वाविना होणार आहे. अंबाबाई मंदिरातील तोफ सोमवारी आणली जाणार आहे.

श्री जोतिबाचा मानाच्या अश्वाचा मृत्यू झाला. यानंतर मानाच्या अश्वासाठी आठ देणगी स्वरूपातील प्रस्ताव आले आहेत. या सर्वांची उद्यापासून पाहणी केली जाणार असून त्यापैकी दोन अश्व जोतिबा देवस्थानसाठी घेतले जाणार आहेत.

जोतिबा यात्रेत सासनकाठी समोर व दर शनिवारी जोतिबासमोर आणि रविवारी पालखीला मानाचा अश्व असतो. यात्रेसाठी काही दिवसांचा कालावधी असल्याने अश्व घेण्याची प्रक्रिया गतीने केली जाणार आहे. नऊ-दहा महिन्याचे हे अश्व असतील, त्यांना महिनाभर प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

यापूर्वी चार महिने मानाचा अश्व पोहाळे येथील देवस्थानच्या जागेत ठेवला जात होता. आता हे दोन्ही अश्व नेहमी पोहाळे येथे ठेवले जाणार असून दर आठवड्याला ते डोंगरावर आणले जातील. या अश्वांना आता गवती चारा बंद करण्यात येणार असून भूसा आणि हरभर्‍यावरच अधिक भर दिला जाणार असल्याचे समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.

अंबाबाई मंदिरात सोमवारी तोफ आणणार

अंबाबाई मंदिरात बसविण्यात येणारी तोफ सोमवारी ताब्यात मिळणार आहे. दुपारी त्याची राजाराम तलावानजीक चाचणी घेतली जाईल, यानंतर ती तोफ अंबाबाई मंदिरात आणली जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news