कोल्हापूर : खासबागेत आज 107 चटकदार कुस्त्या

कोल्हापूर : खासबागेत आज 107 चटकदार कुस्त्या

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बर्‍याच कालावधीनंतर कुस्तीपंढरी कोल्हापुरात बेमुदत निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) चे चिफ पेट्रन शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने हे कुस्ती मैदान होणार आहे. शनिवारी (दि. 7 जानेवारी) दुपारी 3 वाजल्यापासून कुस्त्यांना सुरुवात होईल. मुख्य मोठ्या पाच कुस्त्यांसह 107 चटकदार कुस्त्यांसाठी तब्बल 15 लाख बक्षिसांची घोषणा माजी खा. संभाजीराजे व माजी आ. मालोजीराजे यांनी केली आहे.

कुस्ती स्पर्धेचा बक्षीस समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खा. शरद पवार, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार, आमदार यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने शाहू छत्रपती महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार चांदीची गदा देऊन करण्यात येणार आहे. दरम्यान, मैदानाची जय्यत तयारी कोल्हापूर महानगरपालिका व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने करण्यात आली आहे. आखाड्यात नवीन लाल माती टाकून मैदान परिसरातील डागडुजी करण्यात आली आहे. कुस्ती मैदानात महाराष्ट्रासह कर्नाटक, पंजाब, दिल्ली येथील मल्ल सहभागी होणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news