कोल्हापूर : केडीसीसीच्या ‘त्या’ संचालकांचे मोबाईल नंबर ‘ईडी’ने मागितले

कोल्हापूर : केडीसीसीच्या ‘त्या’ संचालकांचे मोबाईल नंबर ‘ईडी’ने मागितले

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ब्रिक्स कंपनीला केलेल्या कर्जपुरवठ्याबाबत 'ईडी'ने सुरू केलेल्या चौकशीत तीन माजी संचालकांना नोटीस पाठविल्यानंतर आता सन 2015 ते 2021 या कालावधीतील संचालक मंडळाचे फोन नंबर 'ईडी'ने मागवून घेतल्याचे समजते. यामुळे संबंधित संचालकांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, 'ईडी'ची नोटीस आलेल्या तीन माजी संचालकांसह अन्य काही माजी संचालकांनी बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांची भेट घेतली.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर मुश्रीफ यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला. दि. 1 फेब्रुवारी रोजी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह सेनापती कापशी (ता. कागल) व हरळी (ता. गडहिंग्लज) शाखांवर छापा टाकला होता. संताजी घोरपडे साखर कारखान्यावरही 'ईडी'चे पथक या दिवशी गेले होते.

या छाप्यात 'ईडी'ने प्रामुख्याने कर्ज वितरण विभागाचीच तपासणी करून काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. या कागदपत्रांच्या आधारे ब्रिक्स कंपनीला जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाची 'ईडी'ने तपासणी सुरू केली. पहिल्या टप्प्यात 'ईडी'ने बँकेमार्फत तीन माजी संचालकांना नोटीस पाठविली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news