कोल्हापूर : 3.63 लाखांचे ब्रेसलेट जबरदस्तीने काढून घेतले

कोल्हापूर : 3.63 लाखांचे ब्रेसलेट जबरदस्तीने काढून घेतले
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कसबा बावडा येथील व्यापार्‍यांसह कुटुंबीयाला जीवे मारण्याची धमकी देऊन 3 लाख 63 हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात राजारामपुरी पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमोल महादेव भास्कर (वय 39) याच्यासह साथीदाराला शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे.

व्यापारी अमित बाळासाहेब बुकशेट (38, रा. मेन रोड कसबा बावडा) यांनी दि. 19 जुलै 2022 रोजी अमोल भास्कर, संकेत सुरेश व्हटकर (23, बिजली चौक, जवाहरनगर), अजित पाटील (रा. हालोंडी, ता. हातकणंगले) याच्याविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

मे 2021 मध्ये व्यापारी बुकशेठ हे जवाहरनगर चौक येथे थांबलेले असताना अमोल भास्करसह तिघे मोटारीतून आले. संशयितांनी भरचौकात फिर्यादीला शिवीगाळ सुरू केली. 'पैसे देतो म्हणतोस, पण न देता आमची फसवणूक करतो काय', असा सवाल केला.

'माझ्यासह आमच्या गँगची तुला दहशत माहिती नाही काय, तुला आणि तुझ्या फॅमिलीला सोडत नाही. सर्वांना हिसका दाखवितो', अशी धमकी दिली. 'शिवाय तुझी भट्टी लावायला वेळ लागणार नाही', असे म्हणून अमोल भास्करने व्यापार्‍याच्या हातातील 3 लाख 63 हजार रुपये किमतीचे जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतरही 24 नोव्हेंबर 2021 मध्ये सायंकाळी शास्त्रीनगर येथील रेड्याची टकरी मैदान येथे थांबलेले असताना संशयितानी शिवीगाळ करून धमकी दिल्याचेही म्हटले आहे.

अमोल भास्करसह साथीदाराची दहशत असल्याने व्यापार्‍याने संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल केली नव्हती. मात्र वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी केलेल्या आवाहनानुसार नोव्हेंबर 2021 रोजी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याचे त्यात नमूद केले आहे.

अमोल भास्करसह साथीदाराविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यातर्गंत कारवाई करण्यात आली होती. भास्करसह साथीदारांना काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाल्याने सुटका झाली होती.पाठोपाठ व्यापार्‍याला धमकी देऊन दागिने हिसकावून नेल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news