कोल्हापूर : 140 कोटी रुपयांची बोगस बिले दाखवून करचुकवेगिरी

कोल्हापूर : 140 कोटी रुपयांची बोगस बिले दाखवून करचुकवेगिरी
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : 140 कोटी रुपयांची खोटी बिले घेऊन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल चुकविल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोल्हापूर कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत तिरुपती मेटलचे मालक राम दिलीप बेरानी, बालाजी एंटरप्राइजेसचे सुरेश दिलीप बेरानी या दोघा भावांनी आपले नातेवाईक व कामगारांच्या नावावर मे. तिरुपती ट्रेडर्स, मे. दुर्गा ट्रेडिंग आणि मे. कृष्णा एंटरप्राइजेस या बोगस कंपन्या सुरू केल्या.

मे. तिरुपती मेटल व मे. बालाजी एंटरप्राइजेस या दोन्ही प्रकरणांमध्ये वस्तूंच्या प्रत्यक्ष खरेदीशिवाय गुजरातमधील भावनगर व अहमदाबाद येथील बनावट कंपन्यांकडून वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी केली नाही. या बदल्यात बीजके किंवा बिले स्वीकारून शासनाची महसुली फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

अन्वेषण शाखेचे प्रमुख राज्य कर उपायुक्‍त सलीम बागवान, सहायक राज्यकर आयुक्‍त जयांकुर चौगले, राज्यकर निरीक्षक ज्ञानोबा मुके यांनी संयुक्‍तपणे ही कारवाई केली.

बोगस व्यापार करून कर चुकवेगिरी करणार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा अपर राज्य कर आयुक्‍त धंनजय आखाडे व सहआयुक्‍त सुनीता थोरात यांनी दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news