कोरोना मृतांच्या वारसांना मिळणार २८.९८ कोटी सानुग्रह सहाय्य निधी

कोरोना मृतांच्या वारसांना मिळणार २८.९८ कोटी सानुग्रह सहाय्य निधी
Published on
Updated on

कोल्हापूर : एकनाथ नाईक

जिल्ह्यात गेल्या पावणे दोन वर्षांत कोरोना बाधित 2 लाख 6 हजार 796 रुग्ण सापडले. त्यापैकी 2 लाख 927 जण कोरोनामुक्त झाले, तर 5 हजार 796 जणांचा बळी या  कोरोना मुळे गेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य निधी मिळणार असून, त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. एकूण 28 कोटी 98 लाख रुपयांचे सहाय्य मिळणार आहे.

लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात केंद्र व राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते. कोरोनाने निधन झालेल्या किंवा कोरोना निदान झाल्यावर भीतीने आत्महत्या केलेल्या मृतांच्याही नातेवाईकांना ही मदत मिळणार आहे. ही मदत जमा करण्यापूर्वी संबंधितांच्या मृत्यूच्या दाखल्याची पडताळणी केली जाणार आहे. ही मदत मिळविण्यासाठी नातेवाईकांनी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत लीलर्-ीिीं मधून अर्ज करण्याची सोय केली आहे. या कामासाठी नव्याने वेबपोर्टल आठवड्याभरात विकसित केले जाणार आहे. या पोर्टलवर तपशीलवार माहिती असणार आहे.

सानुग्रह सहाय्य निधी मिळविण्यासाठी एचटीपीसीआर, रॅट, मोल्युक्युलर या चाचण्यांमधून अहवाल पॉझिटिव्ह, अहवाल प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत मृत्यू झाला असेल किंवा रुग्णाने आत्महत्या केली असेल तर, 30 दिवसांनंतर देखील व्यक्तीचा झालेला मृत्यू हा कोरोनामुळे मृत्यू असे ग्राह्य धरले जाईल, रुग्णाचा मृत्यू घरी अथवा रुग्णालयात झाला असेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणाची जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 च्या कलम 10 खाली मृत्यूचे कारण स्पष्ट करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र, मृत व्यक्तीचा आधार तपशील नसेल किंवा आधार क्रमांक जुळला नाही तर जिल्हा शल्य चिक्तिसक, मनपा मुख्य आरोग्य अधिकारी मृत्यू प्रमाणपत्राची तपासणी करून संगणकीय प्रणालीवर पाठवतील, आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

अर्ज अस्वीकृत केला असेल किंवा काही तक्रार असेल तर जिल्हास्तरीय, मनपास्तरीय तक्रार निवारण समितीकडे ऑलाईन अर्ज अपील करण्याची सुविधा उपलब्ध आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सानुग्रह अनुदान वितरित करण्यासाठी अंतिम मंजुरी देईल.

जिल्ह्यातील मृत्यू असे

गडहिंग्लज ः 235, शाहूवाडी ः 134, पन्हाळा ः 270, चंदगड ः 83, आजरा ः 142, भुदरगड ः 128, करवीर ः 792, शिरोळ ः 278, हातकणंगले ः 700, गगनबावडा ः 11, कागल ः 204, राधानगरी ः 116, कोल्हापूर शहर ः 1260, नगरपालिका ः 829, जिल्ह्याबाहेरील ः 607

अर्ज दाखल करताना

  • अर्जदाराचा तपशील, आधार क्रमांक, आधार नोंदणी क्रमांक
  • अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील
  • मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील
  • मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र
  • इतर निकट नातेवाईकांचे ना हरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news