केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : होळीच्या सणाआधी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाऊ शकते, अशी माहिती रविवारी सूत्रांनी येथे दिली. केंद्रीय कर्मचार्‍यांचा सध्याचा 38 टक्के इतका महागाई भत्ता 42 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

येत्या 1 मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत असून या बैठकीत महागाई भत्त्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्र सरकारकडून दरवर्षी केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते. यंदा महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ झाली तर 18 हजार रुपये मूळ वेतन असणार्‍या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात दरमहा 720 रुपयांची वाढ होईल.

सध्याच्या 38 टक्के दरानुसार कर्मचार्‍यांना 18 हजार रुपयांच्या मूळ वेतनावर 6 हजार 840 रुपये इतका महागाई भत्ता मिळतो. वाढीव दरानुसार महागाई भत्त्यापोटी कर्मचार्‍यांना मासिक 7 हजार 560 रुपये मिळतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news