कसबा बावडा-शिये रस्त्यावरून वाहनधारकांची ये-जा सुरू

कोल्हापूर : कसबा बावडा-शिये रस्त्यावरून वाहतुक सुरू
कोल्हापूर : कसबा बावडा-शिये रस्त्यावरून वाहतुक सुरू

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : कसबा बावडा-शिये दरम्यानचा रस्त्यावरून वाहतुक सुरू झाल्याचे चित्र आहे. गेल्या गुरुवार (दि. २२) पासून हा मार्ग पूराच्या पाण्यामुळे बंद होता. आज (दि. २९) दुपारी साडेतीन वाजता या रस्त्यावर पंचगंगा नदीचे एक फूट पाणी होते. या पाण्यातूनच वाहनधारकांची ये-जा सुरू होती.

कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात गेल्या चार दिवसांपासून पावसाने उसंत दिली आहे. दरम्यान, आठ दिवसापासून वाहतुकीसाठी बंद असलेला कसबा बावडा ते शिये दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी काहीप्रमाणात खुला झाला.

गुरुवार (दि. २९) दुपारपासून या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली. चार वाजल्यानंतर चार चाकी दुचाकींचीही एक फूट पाण्यातून वाहतूक सुरू झाली. दुपारी चार वाजता पंचगंगा नदीची पाणीपातळी ४० फूट १० इंच होती.

कसबा बावडा-शिये दरम्यानचा शंभर फुटी रस्ता या शहराचे पहिल्या क्रमांकाचे प्रवेशद्वार बनला आहे. शिरोली औद्योगिक वसाहती सह शिये, भुये, टोप संभापूर, वडगाव या लगतच्या परिसरात जाण्यासाठी हा मुख्य संपर्क मार्ग बनला आहे.

सातारा, पुणे, मुंबईकडे जाणारे अनेक वाहने या मार्गाचा वापर करतात. यामुळे या रस्त्यावर अनेक नवे व्यवसाय सुरू होत आहेत.

गेल्या गुरुवारपासून या मार्गावरील सर्व व्यवसाय बंद झाले होते अनेक व्यवसायांच्या ठिकाणी पंचगंगेच्या पुराचे पाणी आले होते. पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता व्यवसायिक पुन्हा साफसफाई मध्ये जास्त झाले आहेत.

शुक्रवारपासून या मार्गावरील व्यवसाय सुरळीत सुरू होतील. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून बंद असलेला विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी वायरमन प्रयत्नशील होते.

रेड अलर्ट मुळे मुख्यमंत्र्यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नियोजित दौरा रद्द रेड अलर्ट मुळे रद्द करण्यात आला आहे. पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने दिल्याने हा दौरा रद्द केल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात अतिमुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांना प्रचंड महापूर आला होता. कोल्हापूर शहरात पाणी घुसले होते. जिल्ह्यातील नदीकाठची गावे पाण्यात गेली होती.

सध्या पूर ओसरत असून राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे होत आहेत.

नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा दौरा केला.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (ता २९) आणि उद्या (ता. ३०) दोन दिवसांच्या कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर येणार होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news