ओडिशात आहेत चक्‍क काळे वाघ!

ओडिशात आहेत चक्‍क काळे वाघ!

भुवनेश्‍वर : पिवळ्या देहावर काळे पट्टे असलेले 'पट्टेरी' वाघ आपल्याला माहिती आहेत. काही वाघ 'अल्बिनो' म्हणजेच पांढरेही असतात. मात्र, कधी 'काळा वाघ' पाहिला आहे का? आपल्याच देशात असे काळे वाघ आढळतात. गेल्याच वर्षी एका हौशी फोटोग्राफरने अशा दुर्मीळ काळ्या वाघाचा फोटो कॅमेर्‍यात कैद केला होता. ओडिशात असे काही काळे वाघ आहेत. ते असे काळे का होतात याबाबत संशोधन झाले आहे.

या वाघांना 'मेलानिस्टिक टायगर' असे म्हटले जाते. बंगळूरच्या नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस (एनसीबीएस) मधील वैज्ञानिक उमा रामकृष्णन आणि त्यांचा विद्यार्थी विनय सागर यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांना असे दिसून आले की या वाघांचा रंग एका विशिष्ट जनुकातील उत्परिवर्तनामुळे उद्भवतो. जनुकांमधील 'सिंगल म्युटेशन' म्हणजेच एका बदलामुळे वाघाच्या अंगावरील काळे पट्टे रुंद होत जातात आणि कधी कधी असे पट्टे एकमेकांमध्ये मिसळून तो पूर्ण काळाही होतो. या काळ्या रंगाला 'स्युडोमेलॅनिस्टिक' किंवा खोटा रंग म्हणतात.

संशोधकांनी भारतातील अन्य वाघांचे अनुवंशिक विश्‍लेषण केले आहे. पूर्ण डेटाच्या आधारे त्यांना असे दिसून आले की सिमिलीपाल अभयारण्याचे असे काळे वाघ हे वाघांच्या उत्पत्तीपासूनच अतिशय कमी संख्येने आहेत. तसेच ते इतर कोणत्याही ठिकाणी आढळलेले नाहीत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news