हाडांतील डेन्सिटी कमी राहिल्यास ऑस्टियोपोरोसिस होऊ शकतो. हा प्रॉब्लेम बहुतांश प्रौढ पुरुष आणि महिलांत दिसतो. यापासून बचाव करण्यासाठी सुरुवातीपासूनच खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही अडचण आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. ऑस्टियोपोरोसिस हा हाडांशी निगडित आजार आहे. बोन डेंसिटी (हाडांचे घनत्व) कमी होते तेव्हा हाडे कमकुवत होऊ लागतात. या स्थितीत थोडाही धक्का बसल्यास हाड मोडण्याची शक्यता राहते. हा आजार पुरुष आणि महिला दोघांतही दिसतो. परंतु, पुरुषांच्या तुलनेत महिलांत हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.
जोखमीच्या गोष्टी : वृद्धापकाळात, प्रौढावस्थेनंतर महिलांत विशेषत: आशियायी देशातील महिलांत, अत्याधिक मद्यसेवन करणारे, थॉयराईडचा आजार असणारे, अमली पदार्थाचे सेवन करणार्या लोकांना ऑस्टियोपोरोसिस होण्याची शक्यता अधिक असते.
प्रमुख लक्षणे : ऑस्टोरोपोरोसिसला सायलेंट डिसिज असे म्हटले जाते. कारण यात कोणतेही स्पष्ट लक्षणे नाहीत. परंतु, काही संकेताच्या आधारावर आजार ओळखता येईल.
अधिक वेळ उभे राहण्यास अडचण
शरिरातील सर्व हाडांत दुखणे
थकवा जाणवणे
पिंडरी, पाय, मांडीतील हाडांत अचानक दुखणे
हा आजार प्रामुख्याने कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते. पौष्टिक आहार न घेणे, मैदानावर न खेळणे या कारणांमुळे हाडांची घनता कमी राहते. महिलांमध्ये विशेषत: बाळंतपणानंतर शरिरावर खूपच परिणाम होतो. आहाराकडे लक्ष दिले नाही तर हाडे कमकुवत होतात. 45 ते 50 वयोगटात
मोनोपाज आल्यानंतर शरिरात अनेक प्रकारचे हार्मोन बदल होतात. या कारणामुळे हाडे
कमकुवत होऊ लागतात. हाडे लवकर अशक्त झाली तर या आजाराचा धोका बळावतो.
उपचार : ऑस्टियोपोरोसिसच्या उपचारात रुग्णाला कॅल्शियम, हायड्रोक्सी व्हिटॅमिन डी हे एक ते दोन वर्षांपर्यंत दिले जाते. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीमध्ये कमतरता असेल तर त्यास इंजेक्शनच्या माध्यमातून कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी दिले जाते. हे हार्मोन शरिरात आढळून येते. परंतु, गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार काही महिन्यांपर्यंत रुग्णाला नेजल स्प्रे रुपातून दिला जातो. याशिवाय बायफॉस्फोनेटस (बीपीएन) औषध वर्षातून एकदा ड्रिपच्या मदतीने रुग्णाला दिले जाते. या औषधाने हाडातील घनत्व आणि शक्ती हळूहळू वाढते. औषधाशिवाय जीन थेरेपीच्या मदतीनेही पेशींची वाढ करता येऊ शकते.
काही उपायांचा अंगिकार करून ऑस्टियोपोरोसिसपासून काही अंशी बचाव करू शकतो.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे
अंडी, हिरव्या पालेभाज्या, ऑरेंज ज्युस, मासे आदींचा आहारात समावेश करणे
दररोज किमान वीस मिनिटे उन्हात चालणे
नियमित व्यायाम करणे