एक्झिट पोल : गुजरातेत भगवी लाट! हिमाचलात रस्सीखेच; ‘आप’ची निराशा; काँग्रेसची ताकदही घटणार

एक्झिट पोल : गुजरातेत भगवी लाट! हिमाचलात रस्सीखेच; ‘आप’ची निराशा; काँग्रेसची ताकदही घटणार
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलच्या सरासरीनुसार गुजरातमध्ये 132 जागा मिळवत सलग पाचव्यांदा भाजपचीच निर्विवाद सत्ता राहील, असा अंदाज आहे तर हिमाचल प्रदेशात मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच होईल, असे चित्र आहे. तेथे भाजपला 35 तर काँग्रेसला 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. गुजरातमध्ये आक्रमक प्रचारामुळे चर्चेत आलेल्या 'आप'चा मात्र धुव्वा उडाल्याचे अंदाजात दिसून येते.

एक्झिट पोलच्या सरासरीनुसार भाजप गुजरातमध्ये विक्रमी आकड्यांसह सत्तेत येत आहे. त्याचा फटका बसत काँग्रेसच्या जागा गत निवडणुकीपेक्षा मोठ्या संख्येने घटत आहेत. गुजरातमधील हे चित्र पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर गुजराती मतदारांनी भरभरून विश्वास टाकल्याचे दिसते.

मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने विक्रमी सात निवडणुकांत भाजपला विजयी बनवले आहे. 'टीव्ही 9'च्या एक्झिट पोलच्या अंदाजांत भाजपला 125 ते 130, काँग्रेसला 30 ते 40 तर आपला 3 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अपक्ष आणि इतरांना 3 ते 7 जागा मिळतील, असा अंदाज आहे. 'जन की बात'च्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला 117 ते 140, काँग्रेसला 34 ते 51 तर आपला 6 ते 13 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 'अ‍ॅक्सिस माय इंडिया'च्या एक्झिट पोलनुसार भाजपला 129 ते 151, काँग्रेसला 10 ते 30 तर आपला 9 ते 21 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अपक्ष आणि इतरांना 2 ते 6 जागा मिळतील.

'सी व्होटर'च्या एक्झिट पोलच्या अंदाजांत भाजपला 128 ते 140, काँग्रेसला 31 ते 43 तर आपला 3 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अपक्ष आणि इतरांना 2 ते 6 जागा मिळतील, असा अंदाज आहे. 'पी मार्क'च्या एक्झिट पोलच्या अंदाजांत भाजपला 128 ते 148, काँग्रेसला 30 ते 42 तर आपला 2 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अपक्ष आणि इतरांना 0 ते 3 जागा मिळतील, असा अंदाज आहे. 'इटीजी'च्या एक्झिट पोलच्या अंदाजांत भाजपला 139, काँग्रेसला 30 तर आपला 11 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अपक्ष आणि इतरांना दोन जागा मिळतील, असा अंदाज आहे.

हिमाचल प्रदेशात चुरस

हिमाचल प्रदेशमध्येही सत्ता राखण्यात भाजपला यश येत असल्याचे एक्झिट पोल सांगत आहेत. मात्र तेथे भाजप व काँग्रेस यांच्यात गुजरातएवढा फरक दिसत नाही. काही एक्झिट पोलनुसार हिमाचलात चुरशीची लढाई होत असल्याचे चित्र आहे.
'जन की बात'च्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला 32 ते 40, काँग्रेसला 27 ते 34, आपला 0 तर अपक्ष व इतरांना 1 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 'अ‍ॅक्सिस माय इंडिया'च्या एक्झिट पोलनुसार भाजपला 24 ते 34, काँग्रेसला 30 ते 40 तर आपला 0 तर अपक्ष आणि इतरांना 4 ते 8 जागा मिळतील. 'चाणक्य'च्या एक्झिट पोलच्या अंदाजांत भाजपला 33, काँग्रेसला 33, आपला 0 तर अपक्ष आणि इतरांना 2 जागा मिळतील, असा अंदाज आहे. 'मॅट्रिझ'च्या एक्झिट पोलच्या अंदाजांत भाजपला 35 ते 40, काँग्रेसला 26 ते 31, आपला 0 तर अपक्ष आणि इतरांना 0 ते 3 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

दिल्ली मनपा आपकडे

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष भाजपला दूर ठेवत सत्ता ताब्यात घेऊ शकेल असे चित्र आहे. दिल्लीत महानगरपालिका भाजपकडे आणि विधानसभा आपकडे असे चित्र आतापर्यंत होते. तेथे आता महानगरपालिकेतील भाजपची सत्ता जात असल्याचे एक्झिट पोलची आकडेवारी सांगते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news