एकनाथ शिंदेंचं बंड; नेमकं काय घडलं? असा आहे घटनाक्रम

घटनाक्रम
घटनाक्रम

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही सत्तारूढ महाविकास आघाडीला धक्‍का बसल्यानंतर मंगळवारी दुसर्‍याच दिवशी महाराष्ट्र राजकीय भूकंपाने हादरला. शिवसेनेचे गटनेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीच बंडाचा झेंडा हाती घेत समर्थक आमदारांसह थेट सुरत गाठले. शिंदे यांच्यासमवेत किमान ४० आमदार असावेत, असा अंदाज आहे. मात्र या बंडाळीने शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीतील सरकार अल्पमतात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे दोन तृतीयांश म्हणजे ३७ आमदार गेल्यास ठाकरे सरकार कधीही कोसळू शकते, अशी स्थिती आहे. यासाठीची जुळवाजुळव कशी होते हे लवकरच स्पष्ट होईल. सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेकडून युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आणि सुरत मुक्‍कामी ठाकरे यांचे दोन दूत पोहोचलेदेखील. मात्र, 'काँग्रेस – राष्ट्रवादीला सोडा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत सरकार बनवा', अशी भूमिका शिंदे यांनी घेतली आहे. तसे कोणतेही आश्‍वासन न देता उद्धव यांनी शिंदे यांना 'मुंबईत या, मला भेटा, सर्व काही व्यवस्थित होईल' इतकेच सांगितले.

घटनाक्रम

  • सोमवारी विधान परिषदेची मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचे दोन गट गुजरातला रवाना
  • नेते जल्लोषात मग्‍न असतानाच बंडाचे राजकीय नाट्य आकाराला आले.
  • सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजता गुजरात सुरत पोलीस कंट्रोल रूमला फोन
  • महाराष्ट्रातील आमदार येत असल्याने ली मेरिडियन हॉटेलला सुरक्षा पुरविण्याचे आदेश. हॉटेलला पोलीस छावणीचे स्वरूप
  • एकनाथ शिंदेंसह 13 आमदारांचा पहिला गट हॉटेलमध्ये दाखल
  • मध्यरात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदेंसह आमदार नॉट रिचेबल असल्याचे नेत्यांना समजले.
  • मंगळवारी सकाळी राजकीय भूकंप; एकनाथ शिंदे यांचे बंड अशा बातम्या सुरू.
  • एकनाथ शिंदे यांच्यासमवेत 13 पासून 35 पर्यंत आमदार असल्याचे दावे सुरू.
  • शिंदे दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर करणार असल्याचे जाहीर. मात्र ही पत्रकार परिषद झालीच नाही.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबईत शिवसेना आमदारांची बैठक बोलविली. बैठकीला 18 आमदार उपस्थित असल्याचा दावा
  • बैठकीत शिवसेनेच्या गटनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना हटविले. अजय चौधरी यांची शिवसेना गटनेतेपदी निवड
  • शरद पवार दिल्लीतील कार्यक्रम रद्द करून मुंबईला परतले.
  • संजय राऊत यांनी दिल्ली दौरा पुढे ढकलला.
  • छगन भुजबळ नाशिक दौरा रद्द करून मुंबईला परतले.
  • एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक सुरतला रवाना

देवेंद्र फडणवीस नाशिक दौरा रद्द करून दिल्लीला रवाना

  • घडलेल्या प्रकाराबाबत माध्यमांशी न बोलण्याचे शिवसेना आमदारांना आदेश
  • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुणे दौरा रद्द
  • एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ.
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाजपवर गंभीर आरोप
  • आकड्यांची जुळवाजुळव कशी करायची हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे : प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया
  • गुजरातमध्ये आमदारांना अडकवून ठेवल्याचा संजय राऊत यांचा आरोप
  • मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक हॉटेलच्या गेटवर दाखल. बराच वेळ गाडीतच बसावे लागले. शिंदे यांनी ग्रीन सिग्‍नल दिल्यानंतरच त्यांना
  • हॉटेलात प्रवेश. नार्वेकर यांच्या फोनवरून शिंदे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा.
  • शाब्बास एकनाथजी! योग्य वेळी निर्णय घेतलास, नाहीतर तुझा दिघे झाला असता ः नारायण राणे यांचे वक्‍तव्य
  • सुरतच्या आमदारांना अहमदाबादला नेणार असल्याचे वृत्त. सुरतमध्ये भाजप नेते मोहित कंबोज दाखल. शिंदे समर्थक आमदारांना ते
  • गोव्याला नेणार असल्याचे वृत्त.
  • काँग्रेस आमदारांची मुंबईत बैठक
  • दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्‍लीत चर्चा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही चर्चेत सहभागी.
  • शिवसेनेने भाजपबरोबर सरकार स्थापन करावे, अशी एकनाथ शिंदे यांची अट
  • शिवसेना खासदारांची मुंबईत बैठक
  • देवेंद्र फडणवीस दिल्लीतून अहमदाबादला रवाना
  • महाराष्ट्रात जे झाले ती फसवणूक ः शरद पवार यांची प्रतिक्रिया
  • शिवसैनिकांना सेना भवनात दाखल होण्याचे आदेश
  • सत्तेसाठी हिंदुत्वाशी प्रतारणा नाही ः एकनाथ शिंदे यांचे ट्विट
  • काँग्रेस व राष्ट्र्रवादीच्या स्वतंत्र बैठका
  • महाविकास आघाडीच्या नेत्यांची रात्री बैठक
  • काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के पाटील मुंबईत दाखल
  • एकनाथ शिंदेंसह ४० आमदार सूरतवरून गुवाहाटीत दाखल

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news