उदय सामंतांचा शिवसेनेला जबर धक्‍का ; शिंदे गटात दाखल

उदय सामंतांचा शिवसेनेला जबर धक्‍का ; शिंदे गटात दाखल
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  ज्येष्ठ शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सेनेची कायदेशीर लढाई सांभाळणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत देखील रविवारी शिंदे गटात दाखल झाले. शिवसेनेला हा आणखी एक जबर धक्‍का होय. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे निम्मे कॅबिनेट मंत्री आणि शंभर टक्के राज्यमंत्री आतापर्यंत बंडखोरांना जाऊन मिळाले आहेत. त्यातही कोकणातील 13 आमदार या बंडात सामील झाल्याने शिवसेनेला या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच मोठे खिंडार पडले आहे.

उदय सामंत हे शनिवारी शिवसेना भवन येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला हजर होते. मात्र आता ते देखील शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. शिंदेंच्या गटात सहभागी होणारे उदय सामंत हे पाचवे कॅबिनेट मंत्री आहेत. याशिवाय तीन राज्यमंत्रीही शिंदे गटात सामील झाले आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहन आणि सज्जड इशार्‍यानंतरही शिवसेनेची गळती थांबायला तयार नाही.

शिवसेनेचे रत्नागिरी आणि कोकणातील उदय सामंत हे एक प्रमुख मंत्री आहेत. कालपासून त्यांचा मोबाईल बंद असल्याने ते देखील फुटल्याची चर्चा सुरू झाली होती. ती अखेर खरी ठरली. ते आता गुवाहाटीला गेल्याने खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात पहिल्यांदा शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. नारायण राणे यांच्या बंडापेक्षा सेनेला आता कोकणात मोठा हादरा बसला आहे. कोकणातील 16 पैकी फक्‍त 3 आमदार आता शिवसेनेकडे उरले आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभव नाईक, रत्नागिरी जिल्ह्यातील राजन साळवी आणि भास्कर जाधव यांचा समावेश आहे.

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये दीपक केसरकर-सावंतवाडी, उदय सामंत- रत्नागिरी, योगेश कदम- दापोली, भरत गोगावले- महाड, महेंद्र दळवी- अलिबाग, महेंद्र थोरवे- कर्जत, एकनाथ शिंदे- कोपरी, प्रताप सरनाईक-ओवळा माजिवडा, गीता जैन- मिराभाईंदर, डॉ. बालाजी किणीकर – अंबरनाथ, विश्‍वनाथ भोईर- कल्याण, शांताराम मोरे- भिवंडी ग्रामीण,श्रीनिवास वणगा-पालघर असे तब्बल 13 आमदार शिंदेंबरोबर गुवाहाटीत आहेत.

दोन तृतीयांश कॅबिनेट मंत्री शिंदेंकडे

आकडेवारीच्याच भाषेत सांगायचे तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी शिंदे गटाला 37 शिवसेना आमदारांची गरज होती. ही संख्या आता 39 वर पोहोचली आहे. शिवाय सेनेला पाठिंबा देणारे 12 अपक्षही शिंदे गटाकडे गेले आहेत. बंडखोरी करणार्‍या मंत्र्यांचे प्रमाणही जवळजवळ दोन तृतियांश झालेले दिसते. या आमदारांसोबत एक एक करून शिवसेनेचे मंत्रीही गुवाहाटीत पोहोचले. उदय सामंत यांच्या बंडखोरीनंतर सरकारमधील शिवसेनेची अवस्था केवीलवाणी झाली आहे.

चारही राज्यमंत्री गेले

41 सदस्यीय महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 31 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्री आहेत. कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे 10, राष्ट्रवादीचे 11 आणि काँग्रेसचे 10 मंत्री आहेत. राष्ट्रवादीचे 4, शिवसेनेचे 4 आणि काँग्रेसचे 2 असे राज्यमंत्रीपदांचे वाटप झाले. रविवार संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या 10 पैकी 5 कॅबिनेट मंत्री गुवाहाटीत बंडखोरांच्या तंबूत पोहोचलेले आहेत. त्यात स्वत: शिंदे यांचाही समावेश आहे. अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई हे शिवसेनेचे राज्यमंत्री आणि शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले राजेंद्र पाटील- यड्रावकर, बच्चू कडू हे चौघेही गुवाहाटीत आहेत.  शिवसेनेकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, अनिल परब आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव यशवंतराव गडाख हे पाच कॅबिनेट मंत्री उरले असून, एकही राज्यमंत्री शिल्लक नाही.

उदय सामंत हे शनिवारी शिवसेना भवन येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला हजर होते. मात्र आता ते देखील शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. शिंदेंच्या गटात सहभागी होणारे उदय सामंत हे पाचवे कॅबिनेट मंत्री आहेत. याशिवाय तीन राज्यमंत्रीही शिंदे गटात सामील झाले आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहन आणि सज्जड इशार्‍यानंतरही शिवसेनेची गळती थांबायला तयार नाही.

शिवसेनेचे रत्नागिरी आणि कोकणातील उदय सामंत हे एक प्रमुख मंत्री आहेत. कालपासून त्यांचा मोबाईल बंद असल्याने ते देखील फुटल्याची चर्चा सुरू झाली होती. ती अखेर खरी ठरली. ते आता गुवाहाटीला गेल्याने खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात पहिल्यांदा शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. नारायण राणे यांच्या बंडापेक्षा सेनेला आता कोकणात मोठा हादरा बसला आहे. कोकणातील 16 पैकी फक्‍त 3 आमदार आता शिवसेनेकडे उरले आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभव नाईक, रत्नागिरी जिल्ह्यातील राजन साळवी आणि भास्कर जाधव यांचा समावेश आहे.

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये दीपक केसरकर – सावंतवाडी, उदय सामंत – रत्नागिरी, योगेश कदम – दापोली, भरत गोगावले – महाड, महेंद्र दळवी – अलिबाग, महेंद्र थोरवे – कर्जत, एकनाथ शिंदे – कोपरी, प्रताप सरनाईक – ओवळा माजिवडा, गीता जैन – मीरा भाईंदर, डॉ. बालाजी किणीकर – अंबरनाथ, विश्‍वनाथ भोईर – कल्याण, शांताराम मोरे – भिवंडी ग्रामीण,श्रीनिवास वणगा – पालघर असे तब्बल 13 आमदार शिंदेंबरोबर गुवाहाटीत आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news