रोम : आयलंड ही निसर्गाने जगाला दिलेली मोठी देणगी दिली आहे. या बेटांवर वर्षातील 365 दिवस नेहमीच वर्दळ असते. पर्यटक जगातील अनेक बेटांना सातत्याने भेट देत असतात. मात्र, या पृथ्वीवर असे एक असे एक बेट आहे की ज्याठिकाणी पर्यटक कधीच जात नाहीत. कारण हे बेट धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. इटलीच्या पोवेग्लिया येथे हे बेट असून इटली सरकारने या बेटावर जाण्यावर बंदी घातली आहे.
पोवेग्लिया बेट आयलंड ऑफ डेथ म्हणूनही ओळखले जाते. इटलीच्या व्हेनिस आणि लिडो शहराच्या मध्ये व्हेनेटियन खाडीवर हे बेट आहे. सध्या या बेटावर जाण्यास कुणालाही परवानगी नाही. या बेटावरील रहस्य उलगडण्यासाठी अनेकजण गेले; पण कोणीच परतले नाही. 16 व्या शतकात इटलीत प्लेगची साथ आली होती. त्यामुळे अनेक लोक प्लेगमुळे मृत्युमुखी पडले होते. संपूर्ण युरोपात प्लेगचा सर्वाधिक परिणाम इटलीवर झाला होता. त्यामुळेच इटली सरकारने प्लेगमुळे आजारी पडलेल्यांना पोवेग्लिया बेटावर शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला होता. हळूहळू या बेटावर सर्व रुग्णच राहू लागले. लाखो रुग्ण या ठिकाणी राहत होते. मात्र, परिस्थिती इतकी वाईट होती की, ज्याला या ठिकाणी आणले त्याला परत घरी जाण्याची संधीच मिळत नव्हती.