इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित भव्य स्मारकासाठी निर्माण करण्यात येणार्‍या पुतळ्याच्या 25 फुटी प्रतिकृतीची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील कारखान्यात गुरुवारी पाहणी केली.

यावेळी मुंडे म्हणाले, पुतळ्याची विविध बाजूंनी आणि वापरण्यात येणार्‍या साहित्याच्या टिकाऊपणाबाबतची चर्चा यावेळी करण्यात आली. सुतार यांनी तयार केलेली प्रतिकृती अत्यंत सुबक आणि सुंदर असून यामध्ये फार काही बदल करण्याची गरज भासणार नाही. काही तांत्रिक बाबी असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील. त्यानंतर साडेतीनशे फुटांचा पुतळा मार्च 2024 पर्यंत तयार होईल, असा दावा मुंडे यांनी केला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साडेतीनशे फुटांच्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीचे काम सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना देण्यात आले आहे. हा पुतळा कसा असेल हे दाखवण्यासाठी त्यांनी 25 फुटांची प्रतिकृती तयार केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news