इंदूर : वृत्तसंस्था : इंदूर येथील इमारतीला शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीच्या घटनेला नवे वळण आले आहे. एका युवकाने एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्याने सुडातून लावलेली ही आग संपूर्ण इमारतीत पसरली आणि 7 जण या आगीत जिवंत जळाले. घरमालक इन्साफ पटेल यांच्या शेजारीच असलेल्या सीसीटीव्हीवरून मिळालेल्या फुटेजच्या माध्यमातून शनिवारी ही क्रौर्यकथा उघड झाली.
आरोपी युवक स्कूटीला आग लावताना या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
इमारतीत राहणार्या एका युवतीवर हा युवक एकतर्फी प्रेम करत होता. युवतीशी त्यावरून वाद झाल्याने युवकाने रागाच्या भरात तिच्या स्कुटीला आग लावली. युवकाची ओळख पटली असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
ईश्वरसिंह सिसोदिया (वय 45), नीतू सिसोदिया (45), आशिष (30), गौरव (38), आकांक्षा अग्रवाल (25) अशी मृतांची नावे आहेत. दोन मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
इमारतीत राहणार्या एका युवतीवर हा युवक एकतर्फी प्रेम करत होता. युवतीशी त्यावरून वाद झाल्याने युवकाने रागाच्या भरात तिच्या स्कुटीला आग लावली. युवकाची ओळख पटली असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. ईश्वरसिंह सिसोदिया (वय 45), नीतू सिसोदिया (45), आशिष (30), गौरव (38), आकांक्षा अग्रवाल (25) अशी मृतांची नावे आहेत. दोन मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.