इंडेक्स फंडाचे विविध प्रकार, जाणून घ्या त्याविषयी

इंडेक्स फंडाचे विविध प्रकार, जाणून घ्या त्याविषयी
Published on
Updated on

इंडेक्स म्हणजे इक्विटी शेअर्सचा किंवा डेटमधील गुंतवणूक साधनांचा एक गुच्छ असे समजायला हरकत नाही. भारतातील प्रमुख इंडायसेस म्हणजे निफ्टी-50, सेन्सेक्स, निफ्टी-100 वगैरे! यातील कोणताही इंडेक्स एखाद्या फंडाचा बेंचमार्क असेल, तर या इंडेक्समध्ये ज्या कंपन्या असतात, त्याच कंपन्यांमध्ये आणि त्यांच्या असणार्‍या वेटेजनुसार फंडाचीही गुंतवणूक होते.

म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर म्हणून काम करत असताना गुंतवणूकदारांकडून सर्वाधिक विचारणा ज्या फंडाबाबत होते, तो फंडप्रकार म्हणजे इंडेक्स फंड! ही विचारणा होण्यामागचे कारण म्हणजे गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनविण्याचे सेबीचे, अ‍ॅम्फीचे, अनेक गुंतवणूक सल्लागारांचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यामधील गुंतवणूक सल्यांचा भाग! कोणताही फंड निवडण्यापूर्वी त्यांचा Expense Ratio पहा, असा सल्ला सर्वजण देत असतात. इंडेक्स फंडांचा अत्यल्प Expense Ratio पाहून गुंतवणूकदार इंडेक्स फंडांची सर्वाधिक माहिती घेत असतात.

म्युच्युअल फंडांची लोकप्रियता भारतामध्ये आता चांगलीच वेगाने वाढत आहे. नोव्हेंबर 2022 च्या अ‍ॅम्फीच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने 40 लाख कोटी रुपयांचा Net Aum आकडा पार केला आहे. एकूण फीलोओ (सर्वसाधारण भाषेत सांगायचे तर म्युच्युअल फंड खाती) जवळजवळ 14 कोटी झाली आहेत आणि SIP चा दरमहाचा आकडाही 13000 कोटी रुपयांच्या पार गेलेला आहे. आणि त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे इंडेक्स फंडांचे काँट्रील्यूशन जे ऑक्टोबर महिन्यामध्ये रु. 5075 कोटी होते, ते नोव्हेंबर 2023 मध्ये 8601 कोटी रु. झाले.

पारंपरिक इक्विटी आणि डेट फंडांच्या पलीकडे गुंतवणूकदार पाहू लागले आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करत असताना त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे फायदे-तोटे आणि मिळवण्याची त्यांची क्षमता या गोष्टी गुंतवणूकदारांनी साकल्याने समजून घेतल्या पाहिजेत.

इंडेक्स म्हणजे इक्विटी शेअर्सचा किंवा डेटमधील गुंतवणूक साधनांचा एक गुच्छ, असे समजायला हरकत नाही. भारतातील प्रमुख इंडायसेस म्हणजे निफ्टी-50, सेन्सेक्स, निफ्टी-100 वगैरे! यातील कोणताही इंडेक्स एखाद्या फंडाचा बेंचमार्क असेल तर या इंडेक्समध्ये ज्या कंपन्या असतात, त्याच कंपन्यांमध्ये आणि त्यांच्या असणार्‍या वेटेजनुसार फंडाचीही गुंतवणूक होते. इंडेक्स फंड हे पॅसिव्ह फंड असतात. म्हणजे इथे फंड मॅनेजरचा शेअर्स निवडण्याचा भाग नसतो. त्यामुळे Iower portfolio turnover हे इंडेक्स फंडाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते. आणि या कमीतकमी portfolio turnover मुळे फंडांचा Expense ratio ही अगदी कमी असतो. त्यामुळे तुम्हाला जर तुमची दीर्घकालीन उद्दिष्ट्ये साध्य करायची असतील (उदा. रिटायरमेंट फंड, मुलांचे शिक्षण इ.) तर इंडेक्स फंड यासाठी अत्यंत योग्य ठरतात. विशेषत: तुम्हाला जर SIP द्वारे दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल, तर इंडेक्स फंडस् तुलनात्मकरित्या सर्वाधिक सुरक्षित साधन आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये तर इंडेक्स फंडांसारख्या Passive फंडांनी नेहमीच Active फंडांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. वॉरेन बफे हे सदैव इंडेक्स फंडांचाच पुरस्कार करतात, हेही तुम्हाला माहीतच असेल.

इंडेक्स फंडाचे खालीलप्रमाणे विविध प्रकार आहेत.
1) Broad – Based Index Funds
(उदा. निफ्टी 50, बीएसई सेन्सेक्स, निफ्टी 500 वगैरे)
2) Market Cap Based Index Funds
(उदा. निफ्टी मिडकप 150, निफ्टी स्मॉलकॅप 250)
3) Equal Waight Index Funds
4) Smart Beta or factor Based Iudex Funds
Factors such as PIE, Divideud Yield
5) Sectors like consumption, infra
6) International Index Funds

इंडेक्स फंडांच्याबाबतीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर इक्विटी फंडांमध्ये फंड मॅनेजर त्या फंडाच्या बेंच मार्कपेक्षा जेवढे अधिक रिटर्नस् मिळवून देईल, Alpha Generation तेवढा ती अधिक यशस्वी फंड मॅनेजर समजला जातो. परंतु इंडेक्स फंडांच्या बाबतीत मात्र फंड मॅनेजरचे उद्दिष्ट बेंचमार्क इंडेक्सपेक्षा अधिक परतावा देण्याचे नसते तर बेंचमार्क इंडेक्सच्या बरोबरीने परतावा देण्याचे असते. भारतातील काही महत्त्वाचे इंडेक्स फंडस् खालीलप्रमाणे आहेत.

भारत साळोखे,
अ‍ॅम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर
डायरेक्टर, अक्षय प्रॉफिट वेल्थ प्रा. लि.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news