बांधकामाचा खर्च कमी होणार! स्टील प्रतिटन 20 हजार रुपयांनी स्वस्त

बांधकामाचा खर्च कमी होणार! स्टील प्रतिटन 20 हजार रुपयांनी स्वस्त
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : बांधकामासाठी लागणार्‍या स्टीलच्या दरात गेल्या चार महिन्यांत मोठी घसरण झाली असून, स्टीलचे दर प्रतिटन 20 हजार रुपयांनी घसरले आहेत. साहजिकच, बांधकामाचा खर्च आता घटेल, अशी अपेक्षा आहे.

यंदाच्या मार्च महिन्यात 85 हजार रुपये प्रतिटन असलेले स्टील 20 हजारांनी कमी झाले आहे. सध्या स्टीलचा दर प्रतिटन 65 हजार रुपयांच्या आसपास आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे मार्च महिन्यात स्टीलचे दर आजवरच्या सर्वात उच्चांकी म्हणजेच 85 हजार रुपये प्रतिटनावर पोहोचले होते. त्यानंतर आता स्टीलच्या दरात घसरण दिसून येत आहे. म्हणून दर घसरले स्टीलच्या निर्यातीवर केंद्र सरकारने करात वाढ केली होती. त्याचा परिणाम निर्यातीवर झाल्याचे दिसून आले आहे. निर्यातीवरील शुल्कामुळे परदेशात जाणारे स्टील महागले. त्याशिवाय काही स्टील उत्पादकांनी निर्यातदेखील कमी केली. स्टीलला मागणी अत्यल्प आहे. त्याचा परिणामही स्टीलच्या दरावर झाला असल्याचे म्हटले जाते. एकीकडे स्टीलला असलेली कमी मागणी आणि दुसरीकडे कच्च्या मालाचे भाव 'जैसे थे' असल्याने स्टील उद्योजकांनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. येणारे काही महिने स्टीलच्या दरात आणखी कपात होणार नसल्याचे म्हटले जात आहे. आधीच स्टील उत्पादकांना मोठा फटका बसला असल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

मागील एक-दोन महिन्यापासून स्टील उद्योजकांनी उत्पादनात कपात केली आहे. दिवाळीच्या सुमारास बांधकाम क्षेत्रासह इतर क्षेत्रांतून पुन्हा मागणी पूर्ववत होईल आणि स्टीलची मागणी वाढेल, अशी अपेक्षा स्टील उद्योजकांना असल्याचे पोलाद ग्रुपचे सहसंचालक नितीन काबरा यांनी म्हटले. केंद्र सरकारने निर्यात शुल्कात वाढ केल्याने भारताचे निर्यातीमधील प्रमाण कमी झाले. बर्‍याच उद्योजकांनी आपले उत्पादन कमी केले. केंद्राकडून निर्यात शुल्क कमी होईल, अशी अपेक्षा आहे. दिवाळीनंतर स्टील उद्योगाला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news