आधी सलमानवर मारहाणीचे आरोप, नंतर पोस्ट केली डिलीट!

आधी सलमानवर मारहाणीचे आरोप, नंतर पोस्ट केली डिलीट!

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खान त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात गर्लफ्रेंड अभिनेत्री सोमी अलीसोबत रिलेशनमध्ये होता. दोघांचे अफेअर अनेक वर्षे चालले. ब्रेकअप झाल्यावर सोमीने मुंबई सोडली आणि ती अमेरिकेला परत गेली. नुकतेच सोमीने सलमानवर तो महिलांना मारहाण करायचा, असा आरोप केला आहे. तिने सलमानला सेडिस्ट असेही म्हटले आहे. सोमीने सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले होते की, महिलांना मारहाण करणारा. केवळ माझ्यासोबतच नाही, तर अशा अनेकजणी आहेत. तो मानसिकद़ृष्ट्या आजारी आहे. सेडिस्टिक आहे. तुम्हाला याची जराही कल्पना नाही.

दरम्यान, काही वेळानंतर सोमीने ही पोस्ट डिलीट केली. सोमीने यापूर्वीही सलमानवर आरोप करताना सलमानने माझी फसवणूक केली, त्यामुळे आमचे ब्रेकअप झाले, असे म्हटले होते. सलमानसाठी सोमी फ्लोरिडाहून भारतात आली होती. काही चित्रपटांत तिने कामही केले. सलमानच्या आयुष्यात ऐश्वर्या आल्यानंतर सलमान आणि सोमीचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news