आता सिसोदियांना तुरुंगात टाकण्याची भाजपची तयारी : केजरीवाल

आता सिसोदियांना तुरुंगात टाकण्याची भाजपची तयारी : केजरीवाल

Published on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सत्येंद्र जैन यांच्यानंतर आता मनीष सिसोदिया यांच्यावरही खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात पाठविण्याचा कट रचला जात आहे, असा आरोप 'आप'चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर पत्रकार परिषदेत केला. आम्हाला एक एक करून तुरुंगात टाकण्याऐवजी 'आप'च्या सर्व मंत्र्यांना एकदाच तुरुंगात टाका, असेही ते म्हणाले.

केजरीवाल म्हणाले, मी काही महिन्यांपूर्वीच सांगितले होते की, खोट्या प्रकरणात भाजप सत्येंद्र जैन यांना अटक करणार आणि आता खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने तपास यंत्रणांना सिसोदिया यांच्याविरोधात कोणत्या ना कोणत्या प्रकारची खोटी केस बनविण्यास सांगितले आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे देशातील शिक्षणक्रांतीचे जनक आहेत.

सत्येंद्र जैन यांनी मोहल्ला क्‍लिनिक सुरू केले आणि लोकांना लस देण्यात मदत केली. आता भाजप त्यांनाच भ्रष्ट म्हणत आहे. विद्यार्थी, पालकांनीच विचार करावा, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन भ्रष्टाचारी असू शकतात का? जर ते भ्रष्टाचारी असतील; तर मग प्रामाणिक कोण आहे?

पंतप्रधानांना माझी हात जोडून विनंती आहे की, एक एक करून तुरुंगात टाकण्याऐवजी 'आप'च्या सर्व मंत्र्यांना, आमदारांना एकत्रच तुरुंगात टाका. सर्व तपास यंत्रणांना सांगा की, एकदाच सर्व तपास करा. एकेका मंत्र्याला अटक केल्याने जनतेच्या कामात अडथळा निर्माण होतो.
– अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news