आता बनणार कोरोनावरील ‘वैश्विक लस’!

आता बनणार कोरोनावरील ‘वैश्विक लस’!
Published on
Updated on

लंडन : कोरोनावर जगभरात लसी विकसित झाल्या आणि लसीकरणही वेगाने झाले. त्यामुळेच सध्या जगात महामारीच्या नव्या लाटा मंदावलेल्या दिसून येत आहेत. भारतातही तिसर्‍या लाटेचा तीव्र प्रभाव जाणवला नाही. या पार्श्वभूमीवर आता एका 'युनिव्हर्सल व्हॅक्सिन'ची चर्चा सुरू झाली आहे. ही वैश्विक लस अशी असेल जी कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटस्वर प्रभावी ठरेल.

'नेचर' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. या 'व्हेरिएंट प्रूफ' लसीबाबत सर्वांनाच कुतुहल आहे. लसींचा दोन डोस किंवा बूस्टर डोसमुळेही मिळणारे संरक्षण कालौघात घटत जाते. आता अशा लसीची गरज आहे जी संक्रमणही रोखेल आणि गंभीर आजारही. अर्थात अशा 'युनिव्हर्सल व्हॅक्सिन'ची संकल्पना काही नवी नाही. 'युनिव्हर्सल फ्लू शॉट' बनवण्यासाठी वैज्ञानिक एका दशकापेक्षाही अधिक काळापासून प्रयत्न करीत आहेत.

2019 मध्ये एका लसीच्या चाचण्या सुरू झाल्या होत्या, मात्र आतापर्यंत तिला विक्रीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे काही तज्ज्ञांना असे वाटते की सध्याचे कोरोना व्हेरिएंटस् आणि भविष्यातील व्हेरिएंटस्वर प्रभावी ठरेल अशी 'युनिव्हर्सल व्हॅक्सिन' लवकर येऊ शकणार नाही. मात्र, काही नव्या संशोधनातून असे दिसून आले की अशी लस बनवणे शक्यही आहे.

अशा लसीमध्ये विषाणूच्या अशा भागांवर वार केला जाईल जो व्हेरिएंट बदलल्यावरही एकसारखेच राहतात. जर रोगप्रतिकारक यंत्रणेला अशा भागांची ओळख करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले तर अशी लस बनवली जाऊ शकते. अमेरिकन सैन्याच्या वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्चने आपल्या पॅन-कोरोना व्हायरस व्हॅक्सिनच्या 'फेज 1' च्या परिणामांची प्रतीक्षा सुरू केली आहे. त्याशिवाय 'डिओसिन' नावाची एक कंपनीही अशी लस विकसित करीत आहे. लवकरच अशी युनिव्हर्सल व्हॅक्सिन तयार होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news