आकाशगंगेत आढळला ‘हॉट स्पॉट’

आकाशगंगेत आढळला ‘हॉट स्पॉट’

न्यूयॉर्क : आपल्या 'मिल्की वे' नावाच्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या 'सॅजिटेरियस ए' नावाच्या कृष्णविवराजवळ एक चमकदार 'हॉट स्पॉट' आढळून आला आहे. त्याचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षाही 30 टक्के अधिक आहे. तो कृष्णविवराभोवती प्रदक्षिणा घालत आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की हा हॉट स्पॉट एखाद्या उष्ण वायूचा बुडबुडा असावा.

प्रत्येक आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एक कृष्णविवर असते. आपल्या 'मिल्की वे' नावाच्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानीही असे कृष्णविवर असून त्याच्याभोवती हा 'हॉट स्पॉट' फिरत आहे. ज्यावेळी एखाद्या तार्‍याचा मृत्यू होतो, म्हणजेच त्याच्यामधील न्यूक्लिअर फ्युएल बाहेर उत्सर्जित होते त्यावेळी या 'सुपरनोव्हा' नावाच्या घटनेनंतर त्याचे रूपांतर प्रचंड आकर्षणशक्ती असलेल्या पोकळीत होते. त्यालाच 'कृष्णविवर' असे म्हटले जाते. त्याची आकर्षण शक्ती इतकी प्रचंड असते की त्याच्या तावडीतून प्रकाशाचा किरणही सुटू शकत नाही.

त्यामुळेच अशा कृष्णविवरांचा छडा लावणे कठीण असते. आपली ग्रहमालिका ज्या 'मिल्की वे' नावाच्या विशाल आकाशगंगेचा एक भाग आहे तिच्या केंद्रस्थानी 'सॅजिटेरियस-ए' नावाचे कृष्णविवर आहे. त्याच्याभोवती हा हॉट स्पॉट केवळ 70 मिनिटांतच एक प्रदक्षिणा पूर्ण करतो इतका तो वेगवान आहे. त्याच्या कक्षेचा आकार बुध ग्रहाच्या कक्षेइतका आहे.

जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर रेडियो अ‍ॅस्ट्रॉनॉमीमधील खगोलशास्त्रज्ञ मॅसिक विलगस यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी व त्यांच्या टीमने हा हॉट स्पॉट शोधण्यासाठी अटाकामा लार्ज मिलीमीटर/सब-मिलीमीटर ऐरे टेलिस्कोपचा वापर केला. त्यासाठी उत्तर चिलीच्या अटाकामा वाळवंटात 66 रेडिओ अँटेनांचे जाळे उभे केलेले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news