अ‍ॅपेंडिक्स वर होतील औषधांनी उपचार!

अ‍ॅपेंडिक्स वर होतील औषधांनी उपचार!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : मानवी शरीरात एक अवशेषी अवयव (वेस्टिजियल ऑर्गन) असते. त्याचे विशेष असे काही काम नसते; पण त्यामध्ये बिघाड निर्माण झाला तर ते शस्त्रक्रिया करून काढावे लागते. हा अवयव म्हणजे अ‍ॅपेंडिक्स. आता संशोधकांनी दावा केला आहे की अ‍ॅपेंडिक्सला आता शस्त्रक्रिया करून काढण्याची गरज नाही. त्याच्यावरील उपचारासाठी अँटिबायोटिक्स विकसित केले आहेत.

शस्त्रक्रिया करून अ‍ॅपेंडिक्स बाहेर काढण्याच्या क्रियेला 'अ‍ॅपेंडेक्टामी' असे म्हटले जाते. संशोधकांनी आता हे नवे औषध आणि अ‍ॅपेंडेक्टामीच्या क्लिनिकल ट्रायलची तुलना करून निष्कर्ष काढले आहेत. त्याच्या आधारे अमेरिकन कॉलेज ऑफ सर्जनने अ‍ॅपेंडिसायटिसवरील उपचारासाठी जारी केलेल्या दिशानिर्देशांमध्ये अशा अँटिबायोटिक्सचा प्रारंभिक उपचार म्हणून स्वीकार केला आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन' मध्ये देण्यात आली आहे.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिनमधील डॉ. डेव्हीड फ्लूम यांनी सांगितले की तीन महिने अँटिबायोटिक्स दिल्यानंतर दहापैकी सात रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज कमी झाली. पुढील चार वर्षांमध्ये केवळ 50 टक्के लोकांना शस्त्रक्रिया करावी लागली. अ‍ॅपेंडिसायटिसच्या रुग्णांना अँटिबायोटिक्स देणे हा एक योग्य उपचार ठरू शकतो. मात्र, तो सर्वच रुग्णांसाठी असेल असे नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news