असा राजा होणे नाही

असा राजा होणे नाही
Published on
Updated on

राजर्षी छत्रपती शाहू महाराज
(26 जून 1874 – 6 मे 1922)
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कृतिशील समाजसुधारक, द्रष्टे पुरुष, क्रांतिकारी विचारांचे प्रणेते, प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत विकासाच्या वाटा खुल्या करणारे युगपुरुष होत.

या कर्त्या नेतृत्वाच्या भरीव आणि दिशादर्शक कार्याचा संक्षिप्त आढावा…

पायाभूत सुविधा

  • भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी धरण बांधले.
  • निपाणी येथे डेक्‍कन रयत असोसिएशन संस्था स्थापन केली.
  • शेतकर्‍यांची सहकारी संस्था
  • शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी 'किंग एडवर्ड अ‍ॅग्रीकल्चरल इन्स्टिट्यूट'ची स्थापना.
  • शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल,
  • शाहूपुरी व्यापारपेठ कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. शेतकर्‍यांना कर्जे

व्यापार उद्योग 

  • शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल,
  • शाहूपुरी व्यापारपेठ कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. शेतकर्‍यांना कर्जे

शिक्षण

  • प्राथमिक शिक्षण सक्‍तीचे व मोफत केले.
  • 500 ते 1000 लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा.
  • जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत, त्या पालकांना प्रतिमहिना 1 रु. दंड आकारण्याची कायदेशीर तरतूद
  • बहुजन समाजात शिक्षणप्रसार स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून राजाज्ञा उत्तम प्रशासनासाठी पाटील शाळा
  • व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा प्राथमिक, माध्यमिक शाळा, पुरोहित शाळा, युवराज / सरदार शाळा, पाटील शाळा, उद्योग शाळा, संस्कृत शाळा, सत्यशोधक शाळा 9 सैनिक शाळा
  • 10 बालवीर शाळा 11 डोंबारी मुलांची शाळा 12 कला शाळा

शिक्षणासाठी वसतिगृहे 

व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (1901) दिगंबर जैन बोर्डिंग (1901) वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (1906) मुस्लिम बोर्डिंग (1906) मिस क्लार्क होस्टेल (1908) दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (1908) श्री नामदेव बोर्डिंग (1908) पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (1912) श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (1915) इंडियन ख्रिश्चन होस्टेल (1915) कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (1915) आर्यसमाज गुरुकुल (1918) वैश्य बोर्डिंग (1918) ढोर चांभार बोर्डिंग (1919) शिवाजी वैदिक विद्यालय वसतिगृह (1920) श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (1920) इंडियन ख्रिश्चन होस्टेल (1921) नाभिक विद्यार्थी वसतिगृह (1921) सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (1920) श्री देवांग बोर्डिंग (1920) उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (1920) चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (1920) वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (1920) श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (1919) चोखामेळा वसतिगृह, नागपूर (1920) छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (1920)

सामाजिक सुधारणा 

  • 6 जुलै 1902 रोजी संस्थानात मागास जातींना 50 टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी.
  • अस्पृश्यांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद.
  • अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद.
  • जातिभेद दूर करण्यासाठी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा.
  • 1917 साली पुनर्विवाहाचा कायदा. विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता.
  • 1896चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात रयतेला मदतीचा हात.
  • दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्य दुकाने, निराधार आश्रमाची स्थापना.
  • संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली.
  • जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा केला.
  • संस्थानात जवळजवळ 100 मराठा-धनगर विवाह घडवून आणले. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला.
  • स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.

सामाजिक समतेचे प्रणेते 

  • स्वातंत्र्यापूर्वी कितीतरी वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे संस्थानात अमलात आणली.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी सहकार्य.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये दलितांचा नेता व भारतीय अग्रणी नेता म्हणून घोषित केले.
  • चित्रकार आबालाल रेहमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन.
  • शाहू महाराजांना 'राजर्षी' उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
  • अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन, आर्थिक मदत. गंगाधर कांबळे यांना कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले.
  • अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून विशेष कार्य. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत 1919 मध्ये बंद केली.

कलेला आश्रय 

संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय. खासबाग कुस्ती मैदानाची उभारणी. पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृहाची उभारणी).

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news