अपूर्वा नेमळेकर रंगली ‘श्यामरंगी’, पाहा तिचे सुरेख फोटो

अपूर्वा नेमळेकर रंगली ‘श्यामरंगी’, पाहा तिचे सुरेख फोटो
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या कातील नजरेने 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील शेवंताच्या व्यक्तिरेखेत रंग भरणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर भलतीच ॲक्टिव असते. 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून अर्ध्यातून बाहेर पडल्यानंतर ती सोशल मीडिया पोस्टमधून चाहत्यांच्या संपर्कात असते. रात्रीस खेळ चाले नंतर अपूर्वा बरेच दिवस छोट्या पडद्यावर दिसली नव्हती. पण आता पुन्हा एका वेगळ्या माध्यमातून ती चाहत्यांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. अपूर्वा डिलिव्हरी बॉय या शॉर्टफिल्ममधून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकतेच तिने या शूटचे फोटो शेअर केले आहेत.

पण अपूर्वा सध्या चर्चेत आहेत ते हटके फोटोशूटमुळे. अपुर्वाने जन्माष्टमीनिमित्त कृष्ण रूपात फोटोशूट केलं आहे. डोक्यावर मोरपीस, हातात वेणू, घननीळ रंग या सगळ्या लुकमध्ये अपूर्वा अगदी सुरेख दिसते आहे. अपूर्वाने या पोस्टला साजेसं भल मोठं' कॅप्शनही दिलं आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अपूर्वा म्हणते, 'भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधीपासूनच त्याचे शत्रू त्याला मारण्यासाठी टपून बसलेले होते. परंतु श्रीकृष्णाने मात्र सर्व संकटांवर मात करून श्रावण कृष्ण अष्टमीला मध्यरात्री जन्म घेतला. हाच दिवस आपण जन्माष्टमी म्हणून साजरी करतो.

भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधीपासूनच त्याचे शत्रू त्याला मारण्यासाठी टपून बसलेले होते. परंतु श्रीकृष्णाने मात्र सर्व संकटांवर मात करून श्रावण कृष्ण अष्टमीला मध्यरात्री जन्म घेतला. हाच दिवस आपण जन्माष्टमी म्हणून साजरी करतो. जी व्यक्ती धर्म, सत्य व न्यायाच्या बाजूने आहे केवळ तीच व्यक्ती योग्य आहे असे श्रीकृष्णाने सांगितले आहे. महाभारत काळापासून आजपर्यंत युद्धात ज्याप्रमाणे कपट होते त्याला सरळमार्गाने उत्तर देता येत नाही. अशावेळी जशास तसेच उत्तर द्यावे लागते. नाठाळाच्या माथी काठीच हाणावी लागते. कपटी माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिले तरच तो वठणीवर येतो.

यासाठी कृष्णनीतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आपल्या ध्येयापासून भरकटलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने ज्ञान देऊन पुन्हा योग्य मार्गावर आणले होते, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य मार्ग दाखवावे हीच त्या केशवाचे चरणी प्रार्थना आहे. श्रीकृष्णाच्या उपदेशांनी तुमचे जीवन उजळून निघावे… श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा |अच्चुतम केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी बल्लभम।'

(फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर इंस्टाग्राम)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news