अंटार्क्टिकातून पेंग्विन लुप्त होण्याची शक्यता

अंटार्क्टिकातून पेंग्विन लुप्त होण्याची शक्यता

न्यूयॉर्क : जलवायू परिवर्तनाचा परिणाम आता प्रत्येक घटकावर होत आहे. यातून आता बर्फाच्छादित प्रदेशात राहणार्‍या पेंग्विन्सवरही होऊ लागला आहे. यामुळे या प्रजातीवर लुप्त होण्याचे संकट घोंघावू लागले आहे. दरम्यान, अमेरिकन सरकारने या पक्ष्यांना ण.ड. एपवरपसशीशव डशिलळशी अलीं आता अन्वये सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक तापमानात वाढ होत असल्याने ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळण्याचाही वेग वाढला आहे. यामुळे या प्रदेेशाचे राजे म्हणून ओळखल्या जाणार्‍या 'एम्प्रर पेंग्विन'वरही लुप्त होण्याचे संकट निर्माण झाले आहे. 'यूएस फिश अँड वाईल्डलाईफ सर्व्हिस'च्या मते, एम्प्रर पेंग्विन्सना आता कायदेशीर संरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. हे पक्षी हजारोंच्या संख्येत कळपाने राहतात. तसेच ते अंटार्क्टिवरील बर्फात आपल्या पिल्लांना जन्म देतात. मात्र, हाच बर्फ आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे वितळत चालला आहे.

वाईल्ड लाईफ संस्थेच्या मते, गेल्या 40 वर्षांत सॅटेलाईट डाटा आणि अन्य पुराव्यांच्या आधारे असे स्पष्ट होते की, पेंग्विन्सवर तुर्तास लुप्त होण्याचा धोका नाही; पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे तसे संकेत मिळत आहेत. अमेरिकन सरकारच्या मतानुसार जलवायू परिवर्तनामुळे पेंग्विन व अन्य पक्षांच्या प्रजननात समस्या येत आहे. तसेच अंटार्क्टिकातील वेडेल सागरी परिसरात हॅलो बे कॉलनी म्हणजे जगातील दुसरी मोठी एम्परर पेंग्विन कॉलनी आहे. या भागातील बर्फाची स्थिती एकदम खराब आहे. यामुळे 2016 मध्ये असंख्य नवजात पिल्ली बुडून गेली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news