झुकेरबर्गची मोठी घोषणा : Whatsapp मध्ये मिळाली मोठी अपडेट; आता ‘हे’ फिचर वापरता येणार

झुकेरबर्गची मोठी घोषणा : Whatsapp मध्ये मिळाली मोठी अपडेट; आता ‘हे’ फिचर वापरता येणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेटाचे स्वामित्व असलेले आणि मॅसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या Whatsapp चे रिअ‍ॅक्शन फिचर्सची टेस्टिंग खूप दिवसांपासून सुरू होती. अखेर हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करून याची माहिती दिलेली आहे. ते म्हणाले की, "Whatsapp Reactions ची अपडेट आजपासून (५ मे) सुरू करण्यात आलेली आहे."

Whatsapp मध्ये नवीन अपडेट आल्यामुळे फेसबुक मॅसेंजर आणि इन्स्टाग्राम मॅसेजमध्ये ज्या पद्धतीने इमोजी वापरता येत होते, त्याच इमोजी रिअ‍ॅक्शन Whatsapp मध्येही तुम्हाला वापरता येऊ शकतात, अशी माहिती मार्क झुकेरबर्ग फेसबुक पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

बीटा व्हर्जनवर पाहायला मिळाली पहिली झलक

मागील महिन्यात Whatsapp च्या इमोजी रिअ‍ॅक्शनची झलक ही बीटा व्हर्जनवर पाहायला मिळाली होती. इमोजी रिअ‍ॅक्शन फिचरला अ‍ॅन्ड्राॅइडच्या बीटा व्हर्जन २.२२.८.३. वर सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळाली होती. पण, आता नव्या अपडेटनंतर Whatsapp मध्ये युजर्सना Like, Love, Laugh, Surprised आणि Thanks अशा ६ इमोजी रिअ‍ॅक्शन्स वापरायला मिळणार आहेत. सध्या तरी युजर्सला कस्टमाईज करण्याची सुविधा मिळणार की नाही, यासंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही.

कोणत्याही मॅसेजवर कशी देणार रिअ‍ॅक्शन?

१) सर्वात पहिले काम तुम्ही तुमचे व्हाॅट्सअप अपडेट करा.
२) त्यानंतर व्हाॅट्सअप उघडून ज्या मॅसेजवर तुम्हाला रिअ‍ॅक्शन द्यायची आहे, तो मॅसेज निवडा.
३) त्यानंतर संबंधित मॅसेजला काही सेकंदांपर्यंत बोटाने दाबून धरा.
४) त्यानतर तुमच्या समोर ६ इमोजी येतील, त्यातील कोणत्याही एकावर टॅप करा.

पहा व्हिडीओ : रजनीकांत स्टाईल डोसा खाल्ला आहे का?

हे वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news