आता Zomato महिला डिलीव्हरी पार्टनर्स दिसणार नव्या लूकमध्ये! कंपनीने लॉन्च केला कुर्ता

Zomato
Zomato
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जोमॅटो (Zomato) च्या महिला डिलीवरी पार्टनर आता नव्या लूकमध्ये दिसणार आहेत. कंपनीने त्यांच्यासाठी एक नवा कुर्ता (kurta) लॉन्च केला आहे. (Zomato)

Women's Day ला शुक्रवारी ऑनलाईन फूड डिलीव्हरी कंपनी जोमॅटोने आपल्या महिला डिलीव्हरी पार्टनर्ससाठी नवा कुर्ता लॉन्च केला आहे. कंपनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली. कंपनीने सांगितले की, अनेक महिला डिलीव्हरी पार्टनरने "वेस्टर्न स्टाईलच्या जोमॅटो टी-शर्टसोबत अस्वस्थता व्यक्त केली होती.

कंपनीने महिला दिनी विभिन्न सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, 'आजपासून जोमॅटो महिला डिलीव्हरी पार्टनर कुर्ता परिधान करणे निवडू शकतातत.' कंपनीच्या निर्णयाचे खूप कौतुक होत आहे. तर काही लोकांचे लक्ष फक्त कुर्तामधील शिलाई केलेल्या खिशावर राहिली. तर काहींनी म्हटले की, काही अन्य लोकांनी घोषणा करताना वेळेवर प्रश्न उपस्थित केले आणि यास 'पब्लिसिटी स्टंट' असल्याचे म्हटले.

कंपनीने शेअर केला व्हिडिओ

कंपनीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काही महिला डिलीव्हरी पार्टनर्स (women delivery partners) आपला नवा ड्रेस परिधान करण्यासाठी सज्ज असताना दिसताहेत आणि फोटोशूट करताना दिसत आहेत. काही डिलीव्हरी पार्टनर्स या कम्फर्टेबल कुर्तासाठी कंपनीच्या निर्णयाचे कौतुकदेखील करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zomato (@zomato)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news