कराड : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारकडून ईडी तसेच अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. केंद्र सरकारकडून हुकूमशाही सुरू असल्याचा दावा करत कराड तालुका युवक काँग्रेसने गुरुवारी सकाळी कराड शहरात निषेध मोर्चा काढला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या निषेध मोर्चा कराड तालुका युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोल्हापूर नाका येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळा परिसरात निषेध मोर्चाची सांगता झाली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
युवक काँग्रेसचे अमित जाधव यांच्यासह कराड तालुका युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.