संसद टीव्हीचे यूट्यूब चॅनल यूट्यूबवरून टाकले काढून

Sansad TV
Sansad TV

पुणे : पुढारी वृत्तसेवा

यूट्यूबने संसद टेलीव्हिजनचे Sansad TV हे यूट्यूब चॅनेल काढून टाकले आहे. संसद टीव्हीने या कारवाईवरील निवेदनात म्हटले होते की 15 फेब्रुवारी रोजी रात्री 1 वाजता चॅनल हॅक करण्यात आले होते, जे पहाटे 4 च्या सुमारास पूर्ववत करण्यात आले. कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी इन) आणि यूट्यूब इंडियाला या संदर्भात माहिती देण्यात आली आहे, असे संसद टीव्हीने त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. हॅकरने चॅनल हॅक केल्यानंतर चॅनलचे नाव बदलून इथरियम केले, जे क्रिप्टोकरन्सीशी संबंधीत आहे, असा दावाही यात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यूट्यूबने कम्युनिटी गाईडलाइनचे उल्लंघन केल्याबद्दल संसद टीव्हीचे चॅनल तात्पुरते काढून टाकले आहे. आधी ते चॅनेल यूट्यूबवर दिसत नव्हते, पण आता त्यावर 404 एरर येत आहे. चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता, जो यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाइनच्या विरोधात होता. या व्हिडिओनंतरच यूट्यूबने हे चॅनल काढून टाकले आणि सर्व व्हिडिओ देखील काढून टाकण्यात आहेत.

रॅन्समवेअरचे हल्ले

काही दिवसांपूर्वीच गो फर्स्ट एअरलाइनचे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते. हे ट्विटर अकाउंट 24 तासांपेक्षा जास्त वेळ हॅकरच्या ताब्यातच होते, मात्र ते खाते आता रिस्टोअर करण्यात आले आहे. गो फर्स्ट एअरलाइनचे ट्विटर अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकरने अकाउंट प्रोफाइलचे नाव बदलून मिचेल सायलूर केले होते.

कोरोना संसर्गाच्या सुरुवातीपासून हॅकिंगच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी, गूगलने एका अहवालात दावा केला होता की भारत हळूहळू रॅन्समवेअर हल्ल्यांचे केंद्र बनत आहे. गुगलने गेल्या दीड वर्षांचा डेटा शेअर केला होता, ज्यामध्ये 80 कोटी पेक्षा अधिक रॅन्समवेअर हल्ल्याच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले होते. या डेटाच्या आधारे, रॅन्समवेअर हल्ल्यांच्या बाबतीत भारत 140 देशांच्या यादीत 6 व्या क्रमांकावर आहे. ही बाब सायबर सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news