जावेद मुलाणी
जावेद मुलाणी

पुणे : सावकारांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्त्या

Published on

वालचंदनगर, पुढारी वृत्तसेवा : व्याजाच्या पैशांसाठी तीन सावकारांनी सातत्याने तगादा लावून मानसिक त्रास दिल्याने सावकारांच्या त्रासाला कंटाळून भरणेवाडी (ता.इंदापूर) येथील जावेद अब्बास मुलाणी (वय ३२ वर्ष) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी वालचंदनगर पोलिसात नवाज अब्बास मुलाणी ( वय ४० रा. भरणेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. वालचंदनगर पोलिसांनी प्रफुल्ल रघुनाथ देवकाते ( रा. पिंपळी ता. बारामती), विजय मोटे (रा. निरावागज ता. बारामती) व संदिप अरुण भोसले (रा . निमसाखरता, इंदापूर) या तिघांवर व्याजाच्या पैशासाठी तगादा लावून आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी महाराष्ट्र सावकारी अधिनियमानूसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जावेद आब्बास मुलाणी यांनी वरील खासगी सावकरांकडून व्याजाने पैसे घेतले होते. दरम्यान, हे सावकार व्याजाच्या पैशासाठी त्याच्याकडे तगादा लावत होते. याशिवाय जावेद यास वारंवार जिवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे या सावकारांच्या त्रासाला कंटाळून जावेद मुलाणी यांनी मंगळवार दि. २३ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जंक्शन ते कळस रसत्यानजीक असलेल्या पत्र्याचे शेडमधील लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्त्या केली.

आत्महत्त्येपूर्वी मुलाणी यांनी चिठ्ठी लिहून खिश्यात ठेवली होती.या चिट्टी मध्ये वरील तीन सावकारांची नावे आहेत. तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरापा लातूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news