पिंपरी : संतप्त तरुणाने घेतला दोघांचा चावा

पिंपरी : संतप्त तरुणाने घेतला दोघांचा चावा

पिंपरी : जुन्या भांडणाच्या रागातून एकाने दोघांचा चावा घेतला. ही घटना शनिवारी (दि. 9) रात्री साडेनऊच्या सुमारास भीमशक्तीनगर झोपडपट्टी, चिखली येथे घडली. प्रशांत प्रभाकर वाघमारे (26, रा. भीमशक्तीनगर झोपडपट्टी, चिखली. मूळ रा. बीड) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जयभीम भिका भालेराव (रा. भीमशक्तीनगर झोपडपट्टी, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांचे शेजारी आहेत.

दरम्यान, एक महिन्यापूर्वी फिर्यादी यांचे आरोपीच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने शनिवारी रात्री फिर्यादी यांना माझ्या वडिलांसोबत भांडण का केले, असे म्हणून मारहाण केली. तसेच, त्यांच्या कानाचा जोरात चावा घेतला. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा भाऊ तेजस आणि वहिनी आले असता आरोपीने त्या दोघांनाही मारहाण केली. त्यानंतर आरोपीने तेजस यांच्या देखील हाताला चावा घेऊन दुखापत केली. आरोपीने फिर्यादी यांच्या आई, वडिलांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news