मुंबई उडवून देण्याची धमकी देणाऱ्या युवकास पोलिसांनी नायगावातून घेतले ताब्यात

file photo
file photo
Published on
Updated on

नरसीफाटा (नांदेड) : सय्यद जाफर – नायगाव तालुक्यातील नावंदी येथील एका तरुणाने चक्क मुंबई उडवून देण्याची धमकी दिल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. त्याचा शोध घेत मुंबई पोलिसांनी नायगाव गाठले. मुंबई पोलीस येईपर्यंत नायगाव पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची अधिक चौकशी करण्यासाठी मुंबईला घेवून गेले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी एकाने ट्विटरवरुन चक्क मुंबई उडवून देण्याची धमकी दिली होती. या खळबळजनक प्रकारामुळे मुंबई पोलिस खडबडून जागी झाली. धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तो व्यक्ती फेक आयडीवरुन मेसेज केल्याचे लक्षात आले. त्यानंतर कसून तपास केला असता धमकी देणारी व्यक्ती नायगांव तालुक्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मुंबई पोलिसांनी सदरची माहिती नायगाव पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीवरून नायगाव पोलिसांनी तालुक्यातील नांवदी येथील श्रीपाद कमलाकर गोरठकर (वय १९) या तरुणास सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.

धमकी देणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर नांदेड एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नायगाव येथे धाव घेतली. मंगळवारी पहाटे मुंबई गुन्हे शाखेचे पथक नायगाव शहरात दाखल झाले. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करुन त्या तरुणाला अधिक चौकशीसाठी मुंबईत घेऊन गेले आहेत. तत्पूर्वी याबाबत चौकशी केली असता बी.कॉम द्वितीय वर्षात शिकत असल्याचे त्याने सांगितले. मानसिक तणावाखाली येवून असा प्रकार केल्याचे सांगितले आहे. श्रीपाद गोरठकर हा सर्वसामान्य कुटुंबातील असून वडील कमलाकर गोरठकर हे गडगा येथे मेडिकल चालवतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news