तुम्हीही बनू शकता ‘रॉ’ एजंट!

तुम्हीही बनू शकता ‘रॉ’ एजंट!
Published on
Updated on

डीआरडीओचा वैज्ञानिक प्रदीप कुरूलकर याला पुणे दहशतवादविरोधी पथकाने अटक केल्याच्या घटनेला पुढील मे महिन्याच्या 3 तारखेला एक वर्ष पूर्ण होईल. पाकिस्तानी गुप्तहेर झारा दासगुप्ता हिच्या मधूर मोहपाशात (हनीट्रॅप) कुरूलकर अडकला अन् त्याने शत्रूराष्ट्र पाकिस्तानला नको ती गोपनीय माहिती पुरवली, या आरोपात तो सध्या तुरुंगात आहे. कुरूलकर हेरगिरी प्रकरणाने भारतीय गुप्तहेर संघटनेची कमजोर बाजू समोर आली आहे. एकेकाळी स्थापनेपासूनच भक्कम असलेली 'रॉ' (ठशीशरीलह । अपरश्रूीळी थळपस) आणि तिचा संस्थापक स्पायमास्टर रामेश्वरनाथ काव यांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

आर. एन. काव किंवा रामेश्वरनाथ काव यांनी भारतीय गुप्तचर संस्था 'रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग'चा पाया घातला तो तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे. म्हणूनच त्यांना 'रॉ'चे पहिले प्रमुख आणि भारताचे स्पायमास्टर म्हणून ओळखले जाते. जगभरातील गुप्तहेर संघटनांशी कमालीच्या समंजसपणे ठेवलेला समन्वय आणि देश व देशांतर्गत अशांत स्थिती हाताळण्याचे त्यांचे कौशल्य यामुळे भारताच्या या गुप्तचर संस्थेला सुरक्षित दिशा मिळाली.

इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्यावेळी बांगलादेशनिर्मितीमध्ये 'रॉ'ने अत्यंत मोलाची भूमिका बजावली. मुक्त वाहिनीला या संघटनेने शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. सामूहिक हत्याकांडामुळे अशांत बनलेल्या पाकिस्तानात काव यांनी भारतीय हेर मोठ्या शिताफीने घुसवले. हा सर्व इतिहास स्पायमास्टर आर. एन. काव यांच्या नावे जमा आहे. अशोक रैना यांनी 'इनसाईड रॉ' या पुस्तकात आर. एन. काव यांच्या गुप्तचर गुणविशेषांचे कौतुक केले आहे. काव हे भारत आणि दक्षिण आशियाई गुप्तचर समुदायातील एक आख्यायिका म्हणून ओळखले जातात. भारतात बसून अफगाणिस्तान, इराण, चीनमधील कुणालाही एक फोन कॉल करून जग ढवळून काढण्याचे सामर्थ्य काव यांच्या ठायी होते. म्हणूनच रॉ ही शक्तिशाली गुप्तहेर संघटना बनू शकली.

अलीकडचा गौरवशाली इतिहास असलेल्या रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंगमध्ये कुणालाही करिअर करता येते का? तर, याचे उत्तर होय असे आहे. कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर यूपीएससी परीक्षा केवळ पास नव्हे, तर तिच्या गुणवत्ता यादीत येऊन 'रॉ'चा एजंट बनू शकतो. यासाठी आणखी एक गुणवत्ता असावी लागते ती म्हणजे, विदेशी भाषा उत्तमपणे बोलता येणे आणि त्यांची उत्तम जाण असणे. आपल्या सेवाकाळात सर्वोत्तम कामगिरी केल्यास ज्येष्ठतेनुसार हेच गुप्तहेर पुढे कॅबिनेट सेक्रेटरी आणि 'रॉ'चे संचालक बनतात. पीएमओच्या अखत्यारीत असलेली 'रॉ' थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करीत असते. अन्य कोणतेही खाते अथवा मंत्र्यांना ती जबाबदार नसते.

'रॉ'मध्ये थेट नियुक्ती केली जात नाही. परदेशी गुप्तचर संघटनांच्या नेटवर्कचे पुरेसे ज्ञान, जगभरातील दहशतवादी संघटनांच्या वेगवेगळ्या घातपाती कारवायांचा तपशील, त्यांचे देश-विदेशात कट-कारस्थान रचणारे भिन्न मॉड्यूल आदी चौफेर माहितीचे भांडार 'रॉ'मध्ये जायची इच्छा असणार्‍या उमेदवाराकडे असावे लागते. वयाच्या 56 व्या वर्षापर्यंत मुलकी सेवेचा अनुभव आणि शक्यतो संरक्षण दल, सशस्त्र दलातील अधिकारी ही 'रॉ'ची पहिली पसंती असते. बुद्धिमान, चाणाक्ष अधिकार्‍यांना 'रॉ' हेरत असते. पंडित नेहरूंनीही काव यांना असेच हेरले होते. अफाट बुद्धिमत्ता आणि धोरणी, मुत्सद्दीपणा, जगातील विविध देशांच्या 'पॉलिसीमेकर्स'ची इत्थंभूत माहिती यामुळे नेहरूंनी त्यांना आपले सुरक्षा सचिव नेमले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news