Yellow alert : विदर्भात पुन्हा यलो अलर्ट, पंचनाम्याला आचारसंहिता अडचण नाही : डॉ. नीलम गोऱ्हे

विदर्भात पुन्हा यलो अलर्ट
विदर्भात पुन्हा यलो अलर्ट

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा विदर्भात पुन्हा एकदा हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत पूर्व, पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हवामान विभागाने येलो अलर्ट दिल्याने विजांचा लखलखाट ढगांचा गडगडाट यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आचारसंहितेची अडचण नाही. तातडीने प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज नागपुरात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली. विदर्भासह मराठवाडा व राज्याच्या अनेक भागात गेल्या तीन दिवसात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने नुकसान केलेले आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी प्रचार दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी आपण तातडीने या संदर्भातील माहिती कार्यकर्त्यांकडून घेतली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात आधीच नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्राथमिक अहवालात अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील प्रभावित दोन तालुक्यांमधील १६ गावांतील १४३ शेतकऱ्यांच्या ९५.४ हेक्टरवरील शेती पिकांना फटका बसला आहे. राज्यकर्ते, विरोधक आणि प्रशासकीय यंत्रणा या सध्या लोकसभा निवडणुकीच्या कामात गुंतलेली असल्याने शेतकरी तातडीच्या मदतीच्या अपेक्षित आहे. कुणीच वाली नाही अशी भावना हवालदिल शेतकऱ्यांची झाली आहे. आतापर्यंत विदर्भातील बुलढाण्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

यवतमाळ, वर्धा, अमरावती, गोंदिया जिल्ह्यात ही पावसाने मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अवकाळी पावसामुळे हिंगण्यातील ८ गावांमधील ११३ शेतकऱ्यांच्या ८०.४ हेक्टरवरील संत्रा, मोसंबी आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले, तर उमरेड तालुक्यातील ८ गावांतील ३० शेतकऱ्यांच्या १५ हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. एकूणच अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १६ गावांतील १४३ शेतकऱ्यांच्या ९५.४ हेक्टरवरील शेती पिकांना फटका बसला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news