Social Media : सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी हिंसा ‘अशी’ ओळखा | पुढारी

Social Media : सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी हिंसा 'अशी' ओळखा

सोशल मीडिया ( Social Media ) , फोन, मोबाईल, इंटरनेट इत्यादीचा उपयोग करून मुलींना त्रास देणं, लैंगिक छळ करणं असे अनेक प्रकार आपण हल्ली बर्‍याचदा ऐकतो, वाचतो. खाली अशा काही प्रकारांची एक यादी दिली आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी हिंसा ओळखण्यासाठीची ती प्रश्नावली आहे. तुमच्या ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून असं केलं जातंय का, हे तुम्ही तपासू शकता आणि तसं होत असेल, तर ही हिंसा आहे, हे लक्षात ठेवा.

संबंधित बातम्या 

हिंसा ओळखण्यासाठीची प्रश्नावली पुढीलप्रमाणे- तुम्हाला मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवले जातात का? तुम्हाला व्हॉटस् अ‍ॅपवरून अश्लील फोटो, व्हिडीओ पाठवले जातात का? तुमची इच्छा नसताना व्हॉटस् अ‍ॅपसारख्या माध्यमातून विनाकारण तुमच्याबरोबर चॅट करण्याचा प्रयत्न केला जातो का? फेसबुकवर असलेल्या तुमच्या फोटोंचा गैरवापर केला गेला आहे का? फेसबुकवर तुमची इच्छा नसतानाही कोणी चॅट करून त्रास देतं का? तुमची प्रोफाईल वापरून किंवा तुमची माहिती वापरून कोणी खोटं अकाऊंट तयार केलंय का? फेसबुकवर मैत्री करून कोणत्याही कारणासाठी फसवलंय का? फेसबुकवरील तुमच्या फोटोचा गैरवापर करून ब्लॅकमेल करतंय का? फेसबुकवर मैत्री करून नंतर प्रेमाचं खोटं नाटक करून तुम्हाला एकांतात बोलवून लैंगिक शोषण केलंय का / करतंय का?.

संबंधित बातम्या

तुम्हाला मेलवरून अश्लील मेसेज, फोटो, व्हिडीओ, एम.एम.एस पाठवले जातात का? तुमच्या खासगी गोष्टीचे तुम्हाला माहीत नसताना फोटो, व्हिडीओ किंवा एम.एम.एस करून त्यासाठी तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातंय का? किंवा सोशल मीडियावर तुमचे फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला न सांगता, तुमची परवानगी न घेता अपलोड केले गेलेत का? डेटिंग अ‍ॅपचा वापर करून तुम्हाला कोणी फसवलंय का? या प्रश्नांची उत्तरं आपणच आपल्या मनाला देऊन पाहा. हल्ली असं वारंवार दिसून येतंय की व्हॉटस् अ‍ॅप, ई-मेल, इन्स्टाग्राम, फेसबुक अशा माध्यमांचा गैरवापर करून मुली व महिलांना त्रास दिला जातो. त्यामुळे अशी माध्यमं वापरताना सावध राहा, सतर्क राहा आणि आपण सुरक्षित आहोत, याची खातरजमा करत राहा. ( Social Media )

Back to top button