Yearly Horoscope 2024 : कुंभ, वार्षिक भविष्य २०२४ : संघर्षांतूनही संमिश्र फळे मिळतील

Yearly Horoscope 2024
Yearly Horoscope 2024

कुंभ : वार्षिक भविष्य २०२४ होराभूषण रघुवीर खदानकर

कुंभ राशीचा शनी हर्षल, वायू तत्व, स्थिर स्वभाव, बोधचिन्ह- पाण्याने (ज्ञानान) भरलेला कुंभ. राशीत घनिष्ठा (२ चरणे), शततारका, पूर्वाभाद्रपदा (३ चरणे) ही नक्षत्रे आहेत. कुंभ रास व शनी दोघेही वायू तत्त्वाचे आहेत. वायुतत्त्व बुद्धिमत्तेचे कारक आहे. याचप्रमाणे हर्षल बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणावर वाढवत असल्यामुळे हर्षलला कुंभ राशीचे स्वामित्व देण्यात आलेले आहे. शनीची ही मूलत्रिकोण राशी असल्यामुळे ही रास शास्त्रज्ञांची, संशोधकांची रास समजतात. येथील चंद्राला चिकाटी, बुद्धिमत्ता वायुतत्त्वामुळे मिळते. (Yearly Horoscope 2024 )

या वर्षात शनी वर्षभर कुंभ राशीतच असल्यामुळे तो साडेसातीत असला, तरी महत्त्वाकांक्षी बनविणारा आहे. या राशीतील मा. देवेंद्र फडणवीसांना साडेसातीतही डॉक्टरेट ही मानद पदवी मिळाली (दि. २६ डिसें. २०२३), तर याच राशीचे मा. अजितदादा पवार यांनी फडणवीसांबरोबर महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून पद स्वीकारले आहे. असेच सुखद अनुभव कुंभ राशीच्या व्यक्तींना या वर्षात शनीमुळे येतील; कारण या चंद्रकुंडलीतील कुंभेचा शनी हा महापुरुष योनीतील असून, त्याची दशमस्थानावरील दृष्टी मोठे अधिकार देणारी आहे. साडेसातीत आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारीचे अधिकार मिळत असतात व मागील वर्षातील मंगळ-प्लुटोच्या अशुभ योगातही दे दोन्ही उपमुख्यमंत्री पाय रोवून टिकून आहेत. त्यामुळे साडेसातीची भीती बाळगू नका. या वर्षात नेपच्यून राहू राशीच्या १२ व्या स्थानी
असल्यामुळे या काळात परदेशगमन पर्यटन इ.चे योग येतील. मीन या स्वराशीतील नेपच्यून चांगली फळे देईल. या वर्षात मेपर्यंत गुरू व हर्षल मेष राशीत तुमच्या राशीच्या तृतीयस्थानी आहे. त्यांची दृष्टी भाग्य व लाभावर असल्यामुळे या काळात मोठ्या लाभाची अपेक्षा राहील; पणजवळच्या व्यक्तींचा विरह होईल. खूप प्रवास व पराकोटीचे प्रयत्न कराल.

मेनंतर गुरू आणि जूननंतर हर्षल शनीच्या केंद्रयोगात राहतील. गुरू मारकेश आहे, तरीही निर्णायक कामात यश मिळेल. नातेवाईकांचा विरोध राहील व गृहसौख्य बिघडेल. निर्णय जपून घ्या. साडेसाती आहे. गुरूचे शनीपुढे चालणार नाही; पण दोन्ही ग्रहांची दृष्टी दशम सत्तास्थानावर असल्याने ते एकमेकाला मदत करतील. कुंभ राशीला शनी योगकारक असल्यामुळे वर्षभर तुम्हाला मदत करणारा राहील. रवी कुंभ राशीत फेब्रु. – मार्चमध्ये राहील. शनीवरून रवीचे भ्रमण उत्तम फल देणारे राहील. बुधाचे फेब्रु. – मार्चमधील कुंभेतील भ्रमण विपरीत राजयोग करणारे असून, विपरीत घटनेतून लाभ करून देणारे आहे; पण जिभेवर नियंत्रण ठेवावे व इतर लोक दुखावले जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. रवीचे मेषेतील (एप्रिल-मे), कर्केतील (जुलै- ऑगस्ट) व वृश्चिक-धनु राशीतील (नोव्हें., डिसें. व जाने.) भ्रमण हमखास यश देणारे आहेत.

रवीचे वृषभेतील (मे-जून), कन्येतील (सप्टें.- ऑक्टो.) व मकरेतील (जाने. फेब्रु. २४) भ्रमण गृहसौख्य बिघडवणारे, संघर्ष वाढविणारे, धंद्यात स्पर्धा वाढविणारे,मंदीचे राहील. मंगळाचे मकरेतील प्लुटोबरोबरचे (फेब्रु.-मार्च), मेषेतील प्लुटोच्या केंद्रातील (जून-जुलै), वृषभेतील (जुलै- ऑगस्टमधील) शनीच्या केंद्रातील व कर्केतील (ऑक्टोबर-नोव्हें. – डिसें.) भ्रमण तुमच्या कसोटीचे खऱ्या अथनि राहील. कर्केच्या मंगळात आरोग्य बिघडू शकेल. काविळीसारख्या विकाराचा त्रास संभवतो. मानसिक संतुलन बिघडू शकते.साडेसातीमुळे हे वर्ष विलंब, अडचणी, त्रासाचा अनुभव देणारे असले, तरी पूर्वार्धात संघर्षातून यश मिळवून देणारे आहे.

Yearly Horoscope 2024 : चंद्रबल (तारखा)

  • जानेवारी- १२, १५, १८, १९, २८, २९, ३०, ३१
  • फेब्रुवारी- १५, १६, २२, २४, २५, २६
  • मार्च- २०, २१, २३, २४, ३०, ३१
  • एप्रिल- १६, १८, १९, २०,२६, २७, २८,२९
  • मे- १३, १५,१७, २३, २४, २५,२७
  • जून-१२, १३, १४, २०, २१, २२, २३, २६
  • जुलै-११, १७, १८, २०, २१, २४, २५
  • ऑगस्ट – १३, १४, १६, १७, २०, २१,२४
  • सप्टें- १०, १२, १६, १७, २०,२१
  • ऑक्टोबर- ९, १०, १२, १४, १५
  • डिसेंबर- ७, १०, ११, १४, १५

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news