Yearly Horoscope 2023 : धनु : उंच भरारी घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल

Yearly Horoscope 2023 : धनु : उंच भरारी घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल
  • होराभूषण : रघुवीर खटावकर

धनु ही अग्नी तत्त्वाची रास असून या राशीत मूळ (जल तत्त्व), पूर्वाषाढा (जल तत्त्व), उत्तराषाढा 1 ले चरण (पृथ्वी तत्त्व) अशी नक्षत्रे आहेत.

धनु या राशीत कोणताही ग्रह उच्च फल देत नाही. मात्र केतू या राशीत उच्च फल देणारा समजला जातो. केतूला आकाश तत्त्व व अग्नी तत्त्व आहे. तर धनुराशी स्वामी गुरू आकाश तत्त्वाचा आहे व धनु रास अग्नी तत्त्वाची आहे. यामुळे केतू धनु राशीत उच्च फळ देतो.

धनु ही गुरूची मूलत्रिकोण राशी आहे. धनु राशीच्या व्यक्ती शारीरिकद़ृष्ट्या व मानसिकद़ृष्ट्या बलदंड असतात. यांच्यापैकी काहीना लहानपणी जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, पण या व्यक्ती धार्मिक विचारसरणीच्या असतात. यांची आध्यात्मिक खोली इतरांना समजू शकत नाही. कोणत्याही अडचणींना ते पुढे येतात. इतरांना मार्गदर्शन करण्याची क्षमता यांच्यात असते. या वर्षात दि. 17 जाने 2023 रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करील. यांची साडेसाती या मानसिक दडपणातून मुक्तता होईल. साडेसातीच्या काळात शनी बरोबर प्लुटोही असल्यामुळे अनेक धनू व्यक्तींना जीवाला मुकावे लागले. शनी कुंभ राशीत अडीच वर्ष राहणार आहे.

दि. 27.2023 रोजी शनी धनु राशीत लोहपादाने कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. थोडे फार कष्ट अजूनही घ्यावे लागणार आहेत पण ते आता तुमच्या भल्यासाठी असणारे आहे. नोकरीत वरचा दर्जा मिळेल. तुमचे नियोजन यापुढे उद्योगातही मोठे यश मिळून देण्यास बांधील राहील. नोकरचकरांचे सौख्य मिळेल. सुखविलास, ऐस आराम मिळेल. आर्थिक लाभासाठी खूप उलाढाली कराल. दि. 18 फेब्रुवारी 2023 रोजी नेपच्युन मीन राशीत प्रवेश करेल. तो धनु राशीसाठही रौप्य पादाने मीन राशीत शुभ फळे देण्याची ग्वाही देत आहे. मीन राशीत नेपच्यून आता 14 वर्षे राहणार आहे. गृहसौख्याबाबत या व्यक्ती संवेदनशील बनतील.

दि.21 एप्रिल रोजी राशीस्वामी गुरू मेष राशीत येणार आहे. 29 एप्रिलपर्यंत 4 थ्या गुरूचीच फळे तुम्हाला मिळणार आहेत. निर्णायक कामात यश मिळेल. पण नातेवाईकांचे फार मनावर घेऊ नका. दि. 21 रोजी धनुराशीसाठी गुरू मेष राशीत रौप्य पादाने येत आहेत व तो धनुराशीला शुभ फले देणार आहे. मेषेतील हा गुरू धनु राशीच्या पंचम स्थानात उत्तम फलदायी होणार आहे. पुत्रप्राप्ती, मंगल कार्ये, धर्मकृत्ये, विद्येतील यश यामुळे आनंद होईल. वरिष्ठांकडून गौरव होईल. अलभ्य लाभ होईल. ऐहिक सुख लाभेल. करमणुकीच्या दृष्टीने हे वर्ष चांगले जाईल. पण गुरूच्या सोबतीला हर्षल व राहू आहेत. हे विसरून चालणार नाही. गुरू हर्षल शिक्षणात पुढे घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असतील पण राहू तुम्हाला गाफील ठेवण्याच्या प्रयत्नात राहील. पण गुरूमुळेच राहू राजयोगाची फले देईल. महिलांना प्रसूती समयी त्रास संभवतो. पण प्रगत तंत्रज्ञानामुळे सर्व अडचणीतून सुटका होऊ शकेल.

तुमच्या राशीला रवि 3 रा कुंभेत (फेब्रु-मार्च) 6 वा वृषभेत (मे-जून) 10वा 11 वा कन्येत तूळेत (सप्टें.-ऑक्टो.., ऑक्टो.-नोव्हें.) उत्तम यश देणारा राहील. विकासासाठी नवीन उपाययोजना आखाल. कमी श्रमात संधी मिळेल. कार्यसिद्धी व त्याचा आर्थिक मोबदला मिळेल. या काळात विवाह ठरेल व होईल. तुमच्या राशीला रवि 4 था मीनेत (मार्च-एप्रिल), 8 वा कर्केत (जुलै-ऑगस्ट) 12 वा वृश्चिकेत (नोव्हें.-डिसें.) असताना घरगृहस्थीची काळजी लावेल. धंद्यात मंदीची लाट येईल. स्पर्धा वाढेल. मोठे खर्च निघतील.

या वर्षात मंगळ वृषभ ते वृश्चिक राशीतून भ्रमण करेल. वृषभेतील मंगल भावनिक दडपण निर्माण करेल. प्रवास घडेल. कर्क-सिंहेतील मंगळ (मे-जून जुलै ऑगस्ट) गृहसौख्य बिघडेल. पोटाची तक्रार निर्माण होईल. धंदा व्यवसायात अस्थिरता निर्माण होईल.
धनुराशीच्या 6 व्या 7 व्या राशीतून वृषभ-मिथुनेतून (एप्रिल-मे) शुक्राचे भ्रमण धंद्यात स्पर्धा वाढवेल. भावनिक दडपण निर्माण होईल. धनुराशीच्या 10 व्या राशीतून कन्येतून (नोव्हे)शुक्राचे भ्रमण चालू असताना धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यास मोठे नुकसान सोसावे लागेल.
प्लुटाश्रे राशीच्या द्वितीय स्थानी आहे. कौटुंबिक व्याप मोठ्या प्रमाणावर राहील व मोठ्या प्रमाणावर अर्थप्राप्तीही होऊ शकेल.
राशीच्या लाभ स्थानातील केतू तुमच्या चांगल्या कामाची कीर्ती दूरवर पसरेल. एकंदरीत पाहता या वर्षात धनु राशीची साडेसातीतून सुटका व शनी व गुरूची कृपा राहील. आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न यावर्षी पूर्ण होऊ शकेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news