यवतमाळ : कारमधून दोन कोटी ७० लाखांची रोकड जप्त

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : आर्णी शहराच्या बायपास परिसरात पोलिसांना एका कारमध्‍ये २ कोटी ७० लाख रुपयांची रोकड आढळले. पाेलिसांनी ही राेकड जप्‍त केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्‍यात आली.

नांदेड येथून काळ्या रंगाची कार शहरात शनिवारी रात्री  आली. पोलिसांनी कार थांबवली. कारमध्ये मधुरम सत्यनारायण स्वामी (वय २८, रा. सराफा लोहार गल्ली नांदेड, बालाजी भीमराव चौधरी (४२, रा. अ जुना नाका बसवेश्वरनगर नांदेड, रोहित के किसनराव सोनपाखरे (२८, रा. राजनगर नांदेड), प्रदीप प्रकाश जोंधळे (२८, रा. नागसेननगर नांदेड), संजीवकुमार निर्मला झा (५५, रा. त्रिमूर्तीनगर नागपूर), गजानन गणेश गिरी (४२, रा. फुलसावंगी फाटा ढाणकी) हे सहाजण आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता संशय बळावला.

पोलिसांनी कारची झडती घेतली. कारमध्‍ये २ कोटी ७० लाख रुपयांच्या ५०० रुपयांच्या ५४ हजार नोटा आढळून आल्या आहे. गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर व पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी आर्णी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news